Horoscope Today 21 May 2024 : वृषभ, कन्यासह 'या' राशींना मोठ्या संधी मिळतील; इतर राशींचं भविष्य काय? वाचा मंगळवारचे राशीभविष्य
Horoscope Today 21 May 2024 : आजचा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 21 May 2024 : पंचांगानुसार, आज 21 मे 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीचे लोक तुमची परिस्थिती फार प्रतिकूल असेल पण तरीही तुम्ही परिस्थितीमधूल पुढे जाण्याचा विचार कराल. तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला फार तडजोड करावी लागेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीचे लोक जोडीदाराच्या हुकूमशाही वृत्तीचा विरोध कराल. कलाकार लोकांना आज चांगल्या संधी मिळतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
दुसऱ्यांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून तुम्हाला पुढे जायचे आहे. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम करण्याचं आयोजन केलं जाईल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. प्रतिकूल परिस्थितीची अवश्य दखल घ्या.
सिंह रास (Leo Horoscope Today)
अनाठाई चिंता आणि निराशा यांचे सावट मनावर येऊ देऊ नका. आर्थिक गुंतवणूक करण्यावर जास्त भर द्या.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कलाकारांना आज वेगवेगळ्या संधी चालून येतील फक्त आलेली संधी आहे हे तुम्ही ओळखले पाहिजे.
तूळ रास (Libra Horoscope Today)
नोकरी व्यवसायामध्ये मनाप्रमाणे बदल कराल. तेथील वातावरणही तुम्हाला सुखावह भासेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
स्थावर इस्टेटिसंबंधी प्रश्न मार्गी लागतील. घरातील वयस्कर माणसांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आजचे काम करायचे ते तात्काळ हाती घ्या म्हणजे कामे लवकर मार्गी लागतील. महिलांना आपल्या आवडी जोपासण्या च्या संधी मिळतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आज दुःखाचे पारडे हलके आणि आनंदाचे पारडे जड होईल. आनंदी आणि उत्साही राहाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या शुभ परिणाम मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. तुमच्या क्षमाशिल उदार वृत्तीचा इतरांना अनुभव येईल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: