Horoscope Today 2 November 2025 : तुळशी विवाहाच्या दिवशी 6 राशी ठरतील भाग्यशाली; लवकरच मिळणार शुभवार्ता, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 2 November 2025 : आजचा रविवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 2 November 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 2 नोव्हेंबर 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. कारण आज तुळशी विवाह (Tulsi Vivah) आहे. तसेच, नुकताच नोव्हेंबरचा महिना सुरु झाला आहे. या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? यासाठी सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
घरातील वातावरण सर्व दृष्टीने पूरक राहील नवीन वास्तूचा विचार करणाऱ्यांना समोर पर्याय दिसतील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वर करणे तुम्ही निष्काळजी आणि उथळ वाटला तरी तुमचे हे रूप असे नाही याचा अनुभव जवळचे लोक घेतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
संतती सौख्य मिळेल मुलांच्या कर्तृत्वामुळे समाधान वाटेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
घरातील वातावरण आनंदी राहील विद्यार्थी अभ्यासात गर्क होतील.
सिंह रास (Leo Horoscope Today)
कला लेखन क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनेक नवीन विचार सुचतील आणि त्यांची कार्यवाही करण्यासाठी बराच वेळ काढाल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
आज काही निर्णय भावनेवर आधारलेले घेतले जातील व्यवसाय खोलवर जाऊन विचार करण्याची परिस्थिती निर्माण होईल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
घरामध्ये जवळच्या जवळ सहली काढण्याचे बेत आखाल श्रीमंती खेळामध्ये जास्त रमाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
महिला भावना अधिष्ठित निर्णय घेतील ग्रह तुमचा कर्तुत्व गाजवायला मदत करतील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
नोकरी व्यवसायात नवीन विचारांचा जास्तीत जास्त अवलंब कराल परंतु बरोबरच्या लोकांना ते पटणार नाही शेवटी कुठेतरी तडजोड करावी लागेल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
जोडीदाराची किरकोळ कारणावरून वाद विवाद झाल्यामुळे घरातील वातावरण थोडे ढवळून निघेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
अपेक्षा कमी ठेवल्या तर अपेक्षाभंगाचे दुःख होत नाही हे सूत्र आज लक्षात ठेवावे लागेल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेवा जोडीदाराच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.















