एक्स्प्लोर

Horoscope Today 17 January 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today 17 January 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 17 January 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 17 जानेवारी 2024 , बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात?  तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

तूळ (Libra Horoscope Tula Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर, या राशीच्या लोकांना परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी देखील मिळू शकते, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर, काम पूर्ण न झाल्यास मानसिक दडपण येईल. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना आज मानसिक ताण जाणवेल.

तरुणांनी मातृभाषेशिवाय नवीन भाषाही शिकली पाहिजे, ही भाषा परदेशीही असू शकते. कौटुंबिक सदस्यांमध्ये एकमेकांप्रती प्रेम वाढेल आणि प्रत्येकजण एकमेकाला आधार देईल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, बदलत्या हवामानामुळे तुम्हाला खोकल्याच्या समस्येला तोंड द्यावं लागेल, तुम्ही थंड गोष्टींपासून दूर राहा. जर जमिनीशी संबंधित एखादे प्रकरण प्रलंबित असेल तर ते आज सोडवले जाऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Vruschik Rashi Today)

बँकांमध्ये काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते, तुम्हाला प्रमोशनही मिळू शकते. परंतु तुम्ही तुमच्या कामासंबंधी गर्व दाखवणे टाळावे. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे तर, तुम्ही आज तुमचे काम पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्ही तुमचे काम पूर्ण तत्परतेने पूर्ण केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

जर आपण तरुणांबद्दल बोललो तर, तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही खूप मेहनत केली पाहिजे, तरच तुम्ही यश मिळवू शकता. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, तुमचे आरोग्य सामान्य राहील. पण तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्या, त्यांना आरोग्याची समस्या जाणवल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार औषधे घ्या, अन्यथा प्रकृती बिघडू शकते. आज तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण कोणत्याही अडचणीत शेजारीच तुमच्या मदतीला सर्वात आधी येतात. 

धनु (Sagittarius Horoscope Dhanu Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आजचा दिवस तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप व्यस्त असेल. कामाच्या लोडमुळे तुम्ही खूप व्यस्त असाल. व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचे तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. तुमचा व्यवसाय चांगल्या गतीने होईल, यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. तरुणांबद्दल सांगायचे तर, तुम्हाला तुमच्या ज्येष्ठांचे आणि तुमच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकता.  

विद्यार्थ्यांबद्दल सांगायचे तर, विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाबाबत गांभीर्य बाळगावे आणि चुकीच्या मित्रांच्या संगतीपासून दूर राहावे.  विद्यार्थ्यांनी जास्त बाहेर फिरायला जाऊ नये, तरच त्यांना यश मिळेल. तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यायला हवी. जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर काळजी घ्यावी. थंड आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, तरच तुमचे आरोग्य चांगले राहील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत किंवा तुमच्या सर्व नातेवाईकांसह धार्मिक सहलीला जाऊ शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Guru Pushya Yog 2024 : जानेवारीत खरेदीसाठी, मंगल कार्यांसाठी 'हा' दिवस खास! बनतोय गुरू पुष्य योग; जाणून घ्या तारीख

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना

व्हिडीओ

Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report
Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget