एक्स्प्लोर

Horoscope Today 14 June 2023 : वृषभ, धनु, मकर, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचं राशीभविष्य

Horoscope Today 14 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 14 June 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मिथुन राशीच्या लोकांच्या व्यवसायात वाढ होईल. कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा बुधवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांकडून मान-सन्मान वाढेल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरोघरी पूजा आणि पाठही आयोजित केले जातील. कामाच्या ठिकाणी लोकांशी संवाद साधताना संयमाने वागा. सावधगिरी बाळगा. जोडीदाराबरोबर आजचा दिवस चांगला जाईल. वरिष्ठांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे. नोकरदार लोकांनी नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावीत.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताणही जास्त असेल, परंतु तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. तुम्ही तुमचे विचार आज तुमच्या पालकांसोबत शेअर कराल. जोडीदाराटा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायाला पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आज सर्व कामे वेळेत पूर्ण करा अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. आज तुम्हाला समाजाचं भलं करण्याची संधी मिळेल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही वेळ घालवा. 

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज नातेवाईकांकडून शुभवार्ता ऐकायला मिळेल. नातेवाईकाच्या तब्येतीत सुधारणा होईल. लोकांच्या मदतीसाठी तुम्ही पुढे जाल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यासमोर नवीन आव्हाने येतील. मात्र, न डगमगता या आव्हानांचा सामना करा. आज अनावश्यक वादात पडू नका. तुमच्या ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. तुम्हाला सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या पालकांसोबत शेअर करा. तुमचं मन हलकं होईल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. जे लोक अजूनही अविवाहित आहेत, त्यांना आज चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर यश तुमचंच असेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. आज तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांशी नम्रपणे वागा. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरदार लोकांना नोकरीत नवीन कराराचा फायदा होईल. मानसिकदृष्ट्या खूप हलके वाटेल. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनात आनंदी दिसतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. उद्या एखाद्या मित्रामुळे तुम्ही अडचणीत येण्याचे टाळू शकाल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. जे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहिल. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना कराल. आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल, परंतु आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा. उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना आज तुमच्या नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. याचा भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. अधिकाऱ्यांशी बोलताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जीवनशैलीच्या वस्तूंकडे कल वाढेल, त्यामुळे जास्त खर्च होईल. घरात सुख-शांती नांदेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदार लोकांना उद्या नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. तुमचे स्थानही वाढेल. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला जाणार आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. आज नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळेल, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. कटू गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. बोलण्यात गोडवा ठेवा. सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कार्य पूर्ण होतील. 

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात इच्छित नफा मिळाल्यानंतर ते खूप आनंदी होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही परत करु शकता. खर्च आणि गुंतवणूक वाढत राहतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी कराल. लोकांकडून प्रशंसा मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना यश मिळेल. आज तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या व्यवसायात लाभ होईल. आळशीपणामुळे तुम्ही तुमची कामे उद्यावर ढकलू शकता. तुम्ही तुमचे विचार तुमच्या पालकांबरोबर शेअर करा. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आणि कनिष्ठांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेपूर्वी पूर्ण करू शकाल. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर खूप आनंद होईल. आज धार्मिक स्थळांना भेट द्या. तुम्हाला प्रसन्न वाटेल. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी आहे. आज तुम्हाला राजकारणात यश मिळेल. तरूणांसाठी आज त्यांचे प्रेम जीवन चांगले राहील. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर रोमँटिक डिनरवर जाल. व्यवसाय करणारे लोक देखील व्यवसायाशी संबंधित सहलीला जाण्याची शक्यता आहे, जे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असेल. आज तुम्हाला पैशांची बचत करण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज नवीन पाहुण्यांच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना आखा. जे घरबसल्या ऑनलाइन काम करतात, त्यांना चांगले पैसे मिळू शकतात.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुमचे रखडेले पैसे तुम्हाला परत मिळतील. आज तुम्हाला नातेवाईक किंवा मित्र मंडळींकडून भेटवस्तू मिळू शकतील. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज आर्थिक लाभ होऊ शकतो. बऱ्याच दिवसांपासून जर तुम्ही घर, शॉप, किंवा फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल तर आज चांगला योग आहे. आरोग्य चांगले राहील. मुलांच्या भविष्यासाठी पैसे गुंतवा जेणेकरून येणाऱ्या काळात कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. आज स्वतःसाठी थोडी खरेदी करा. बऱ्याच दिवसांपासून तुमची दिनचर्या जर तीच असेल तर आज तुमच्या दिनचर्येत काही बदल करा त्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today : वृषभ, कर्क, तूळ आणि धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 February 2025Special Report Ujjwal Nikam | निकमांकडे वकीलपत्र, तरीही आरोपांचं सत्र;नियुक्तीवर देशमुख कुटुंब समाधानीSpecial Report | Uddhav Thackeray | ठाकरेंकडून शिंदेंना शिंगावर, फडणवीसांना डोक्यावर?Zero Hour | Swarget Bus Depo News | 'शिवशाही'त बलात्कार एसटीचं 'वस्रहरण',झीरो अवर शोमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
Embed widget