एक्स्प्लोर

Horoscope Today 13 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 13 October 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 13 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं कौतुक होऊ शकतं आणि सगळे तुमची तोंडभरुन प्रशंसा करू शकतात. आज तुम्ही कामावर खूप समाधानी असाल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, शेतीची कामं करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी (Student) - आजच्या तरुणांनी थोडी धार्मिक कार्य केली पाहिजे, देवावर श्रद्धा दृढ ठेवावी, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुमची सर्व प्रलंबित कामं लवकरच पूर्ण होतील.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण तुम्ही या आजारांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आजार वाढू शकतात.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्ही थोडं सावध राहा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मागील कामांची यादी ठेवावी, कारण तुम्हाला त्याबाबत विचारलं जाऊ शकतं. तुम्ही तुमची प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. आज तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल.

विद्यार्थी (Student) - एखाद्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण तुम्हाला मिळू शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुमचं आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास होणार नाही. डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करत राहा.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामातील यश पाहून तुमच्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो, म्हणून तुम्ही तुमचा अहंकार सोडून कामात आणखी यशस्वी कामगिरी करण्याचा प्रयत्न करा.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज गरजूंच्या मदतीसाठी पुढे आलं पाहिजे, तुम्हाला त्यांचे खूप आशीर्वाद लाभतील. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरी घालवायला आवडेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, जे वैद्यकीय क्षेत्रात जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांना त्यांच्या अभ्यासाचं वेळापत्रक वाढवावं लागेल. जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा कमी मेहनत केली तर तुम्हाला यश मिळणार नाही. जर तुम्हाला एकटं वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या भावंडांसोबत वेळ घालवू शकता.

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे निभावाल, कारण काम चुकलं तर तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे विरोधक याचा फायदा घेऊ शकतात. 

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं विकणं टाळावं लागेल, अन्यथा तुम्ही एखाद्या संकटात सापडू शकतात. तुम्ही काही बिनबुडाच्या आरोपातही अडकू शकता. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही मोठ्यांचा आदर केला पाहिजे, त्यांना उलटं बोलू नका. आज जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला पाहिजे.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज पचायला हलकं अन्न खा, नाहीतर तुमचं पोट खराब होऊ शकतं, त्यामुळे सहज पचणारं अन्न खावं. 

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामासाठी काही ट्रेनिंग घेण्याचा विचार करू शकता, ट्रेनिंगसाठी तुमचा वेळ चांगला असेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं वागावं लागेल, कारण त्यांना देखील तुमच्याकडून चांगल्या शब्दांच्या अपेक्षा असतात. चांगले संबंध ठेवल्यास ते चांगलं काम करतील आणि तुमचा व्यवसाय नफ्यात राहील.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही, तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्ही भविष्यातील योजनांवर खूप विचाक करू शकता. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका, अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही मोठ्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तिथे नोकरीही मिळू शकते, यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यावसायिकांनी आपल्या पैशाच्या व्यवहाराबाबत थोडं सावध राहिलं तर बरं होईल, कारण पैशाच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज एखादा ग्राहक पैशांबाबत तुमची फसवणूक करू शकतो.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज प्रतिकूल परिस्थितीसाठी स्वतःला तयार केलं पाहिजे, कारण जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार होत नाही. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर आरोग्याची काळजी घ्या, जास्त वजन उचलू नका. खूप थंड अन्न खाणं टाळलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन राखलं पाहिजे. 

तूळ रास (Libra Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुम्ही कामाच्या ठिकाणी कोणतीच भूमिका घेऊ नका. अन्यथा ऑफिसमधील सहकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. 

आरोग्य (Health) - जे हृदयरोगी आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला छातीत दुखणं, नैराश्य, अस्वस्थपणा यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

व्यवसाय (Business) - आज तुम्हाला व्यवसायात जास्त माणसांची गरज भासू शकते. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची तुम्ही लवकरच निवड करावी. 

प्रेमसंबंध (Relationship) - जर तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीबरोबर तुमच्या भावना शेअर करायच्या असतील तर तुम्ही त्या व्यक्त करू शकतात. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय घेताना तुम्ही कोणतीच घाई-गडबड करू नका. अन्यथा नंतर पश्चाताप होऊ शकतो. 

आरोग्य (Health) - महिलांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. सांधेदुखीचा आजार तुम्हाला जास्त त्रास देऊ शकतो. 

व्यवसाय (Business) - जर तुमच्या व्यवसायात एखादं महत्त्वाचं काम अनेक दिवसांपासून रखडलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्या. 

युवक (Youth) - आज तुमचे तुमच्या मित्राबरोबर वाद होऊ शकतात. जुन्या गोष्टी पुन्हा बाहेर काढल्या जाऊ शकतात. पण हा वाद जास्त वाढू देऊ नका अन्यथा तुम्ही मैत्री गमवाल. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर तुमचे बॉस खूप खुश असतील. तुम्हाला नोकरीत बढतीची संधी देखील मिळू शकते. 

आरोग्य (Health) - ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे त्यांना आज अस्वस्थ वाटू शकतं. यासाठी थोडा वेळ आराम करा. 

व्यवसाय (Business) - जर तुम्ही कोणाकडून पैसे उधारी घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा. कारण याचा तुमच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

युवक (Youth) - जर तुम्ही एखाद्या स्पर्धेची तयारी करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळू शकतं. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या कामात काही अडथळे येत असतील तर हे अडथळे आणखी काही काळ चालू राहतील, त्यानंतर सर्व काही ठीक होईल.

व्यवसाय (Business) - जर तुम्हाला भागीदारीत कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आता करू नका, अन्यथा, तुमचा भागीदार तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतो.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तरुणांनी जीवनात यश मिळवण्यासाठी सतत मेहनत करत राहावं, त्यांना यश नक्की मिळेल.

आरोग्य (Health) - आज पोटाशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच औषधं घ्या. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका.

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस ऑफिसमध्ये तुमच्यासाठी अनुकूल असेल, नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील.

व्यवसाय (Business) - व्यवसाय क्षेत्राशी संबंधित लोकांना आज नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती देखील खूप मजबूत होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही.

कुटुंब (Family) - आज तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात संतुलन राखले पाहिजे, अन्यथा तुमच्या कुटुंबातील कोणाशी तरी वाद होऊ शकतो. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या. आज तुम्ही होळीसाठी गुलाल खरेदी करू शकता. 

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - कोणतेही काम घाईत करू नका, अन्यथा तुमचे घाईचे काम तुमची डोकेदुखी बनू शकते.

व्यवसाय (Business) - आजचा दिवस तुमच्यासाठी पैशाच्या बाबतीत काही चढ-उतार घेऊन येईल, त्यामुळे विचार न करता कोणाशीही पैशाशी संबंधित व्यवहार न केल्यास चांगलं होईल, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात.

विद्यार्थी (Student) - सीएस आणि आयटीच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं नियोजन करावं.

आरोग्य (Health) - तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget