एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Horoscope Today 13 February 2024 : आजचा सोमवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 13 February 2024 : 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 13 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच, 13 फेब्रुवारी 2024, मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, कर्क राशीच्या लोकांना आज नोकरीत तुम्हाला प्रगतीच्या संधी प्राप्त होतील,  वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांना आज पैशांची गरज भासू शकते. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

मेष (Aries Horoscope Mesh Rashi Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस साधारण राहील. आज तुम्हाला ऑफिसमध्ये कामाचा अधिक भार जाणवेल आणि यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल.व्यवसायांना आज व्यवसायात जास्त फायदाही होणार नाही किंवा जास्त नुकसानही होणार नाही. व्यावसायिकांनी ग्राहकांशी चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. आज तुमच्या कुटुंबात काही वाद उद्भवू शकतात, आज तुम्ही कौटुंबिक स्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु थोडा डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो.

वृषभ (Taurus Horoscope Vrushabh Rashi Today)

वृषभ राशीच्या नोकरदारांना आज व्यवसायात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमचे वरिष्ठ तुम्हाला काही अवघड काम देऊ शकतात, जे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अफाट मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर व्यावसायिक भागीादाराशी योग्य समन्वय साधा, यामुळे तुमचा व्यवसाय उच्च पातळी गाठेल. वृषभ राशीचे तरुण आज मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात, परंतु आधी पालकांची संमती घेतली पाहिजे आणि मगच फिरायला गेलं पाहिजे. आज तुम्ही उपाशी राहू नका, अन्यथा तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास जाणवेल.

मिथुन (Gemini Horoscope Mitun Rashi Today)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला राहील.नोकरी करणारे आज उत्कृष्ट कामगिरी बजावतील, ज्यामुळे वरिष्ठही तुमची प्रशंसा करतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन योजना आखताना बिझनेस पार्टनरचा सल्ला देखील घ्यावा. आज तुम्ही कुटुंबासोबत तुमची आवडती वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जाऊ शकतात, परंतु तिथे तुमचा खर्च वाढू शकतो. आज तुम्ही आरोग्याची विशेष काळजी घ्या. थायरॉईडचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्या. सकाळी नियमित व्यायाम करण्याची सवय लावा.

कर्क (Cancer Horoscope Kark Rashi Today)

कर्क राशीच्या नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आज नोकरीत तुम्हाला प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. व्यावसायिकांनी आज गुंतवणुकीचा विचार करू नये, अन्यथा आज तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. जर तुमच्या कुटुंबात बऱ्याच काळापासून वाद सुरू असेल तर आज सर्व वाद मिटतील, यामुळे तुम्हाला मानसिक शांति मिळेल.आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील. लॅपटॉप, कॉम्प्युटरवर काम करताना चष्म्याचा वापर आवश्य करावा.

सिंह (Leo Horoscope Singh Rashi Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस तणावाचा असेल. आज ऑफिसमध्ये तुमच्यावर कामाचा अधिक भार असेल, पण तरीही तुम्ही सर्व कामं योग्य रितीने हाताळाल. तुमचे वरिष्ठ तुमची काम करण्याची क्षमता पाहून खुश होतील. व्यावसायिक आज कठीण परिस्थितीतून स्वत:ला बाहेर काढतील. व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्वपदावर येईल आणि तुम्ही चांगला नफा कमवायला लागाल. आज तुमची कौटुंबिक स्थिती चांगली असेल. उत्तम आरोग्यासाठी तु्म्ही तुमच्या दिनचर्येत योगासनांचा समावेश केला पाहिजे.

कन्या (Virgo Horoscope Kanya Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस साधारण असेल. नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी दबावात येऊ नये, जितकं काम शक्य आहे, तितकंच काम करावं. आज तुम्ही कामाचा जास्त ताण घेऊ नये, अन्यथा तुमचं आरोग्य बिघडू शकतं.भागीदारीत व्यवसाय करणारे आज बिझनेस पार्टनरवर शंका घेऊ शकतात. आज तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार नाही. कन्या राशीचं वैवाहिक जीवन आज चांगलं असेल, तुम्हाला करिअरमध्येही तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. उत्तम आरोग्यासाठी तुम्ही योगासनांचा अवलंब करावा.

तूळ (Libra Horoscope Tula Rashi Today)

तूळ राशीचा आजचा दिवस चांगला असेल. नोकरीत आज तुम्हाला सहकाऱ्यांची मदत मिळेल, कामाच्या ठिकाणीही तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. व्यावसायिकांनी आज व्यवसायात अधिक लक्ष दिलं पाहिजे, तुमचं प्रोडक्ट अधिकाधिक लोकांकडे पोहोचेल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे.तुम्ही घरातल्यांना मदत करण्यास जात असाल तर आधी त्यांच्याशी बोलून घ्यावं. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, सकाळी उठताच तुम्ही फळांचं सेवन केलं पाहिजे. जंक फूडचं सेवन तुम्ही टाळलं पाहिजे.

वृश्चिक (Scorpio Horoscope Vruschik Rashi Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असेल, परंतु नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी चतुर लोकांपासून दूर राहावं, अन्यथा तुमची प्रगती थांबेल आणि तुमची प्रतिमा देखील खराब होईल. व्यावसायिकांना आज पैशांची गरज भासू शकते, अशा वेळी तुम्ही कुटुंबियांची मदत घेऊ शकतात. तरुणांनी आज सर्व निर्णय विचारपूर्वक घ्यावे. जे घरापासून दूर, पालकांपासून दूर राहतात त्यांनी फोनवरुन कुटुंबियांशी संपर्क साधावा. घरातील व्यक्तींच्या आरोग्याविषयी चौकशी करावी. आज घरातील लहान मुलांची काळजी घ्या, त्यांना खेळताना दुखापत होऊ शकते.

धनु (Sagittarius Horoscope Dhanu Rashi Today)

धनु राशीसाठी आजचा दिवस ठिक-ठाक असेल. नोकरदार आज कामातीस परफेक्शनच्या नादात नको ती डोकेदुखी वाढवून घेऊ शकतात. जे व्यावसायिक फ्रांचायजी घेऊन व्यवसाय चालवतात, त्यांनी ब्रँडची प्रतिमा अबाधित राहील, याची काळजी घ्यावी. तरुणांनी आज खोट्या लोकांपासून दूर राहावं, कुणावरही जास्त विश्वास ठेऊ नये. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्ही तळलेले पदार्थ खाऊ नये, अन्यथा तुम्हाला आरोग्याची समस्या जाणवेल. तुम्ही जंक फूड खाऊ नये, अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

मकर (Capricorn Horoscope Makar Rashi Today)

मकर राशीच्या लोकांनी आजच्या दिवसात सावध राहावं. आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील कोणत्याही प्रकारच्या भांडणापासून दूर राहा. व्यावसायिकांनी आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नये, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. तरुणांनी भूतकाळातील गोष्टी मनावर घेऊ नका, त्या गोष्टी मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही तुमच्या सासरच्या मंडळींसोबत एखाद्या शुभकार्यात सहभागी होऊ शकता, जिथे तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना भेटाल, त्यांच्यासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, फक्त थोडीशी डोकेदुखी तुम्हाला त्रास देऊ शकते. 

कुंभ (Aquarius Horoscope Kumbha Rashi Today)

कुंभ राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. नोकरदारांना ऑफिसमध्ये सहकाऱ्याचं सहकार्य लाभेल, तुम्हाला वरिष्ठ देखील एखाद्या कामात मदत करतील. व्यावसायिकांनी आज व्यवसायात सावधगिरी बाळगली पाहिजे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना आज समस्या जाणवतील. आज तुम्हाला किचनमध्ये काम करताना सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा चाकूमुळे किंवा धारदार शस्त्रामुळे दुखापत होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला पोटदुखीचा त्रास देखील जाणवू शकतो.

मीन (Pisces Horoscope Meen Rashi Today)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. जर तुम्ही एखाद्या कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत असाल तर सर्व कर्मचाऱ्यांशी समान वागा, अन्यथा कर्मचारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. व्यावसायिकांनी व्यवसायाशी संबंधित सर्व सरकारी कागदपत्र तयार ठेवावी, अन्यथा तुम्हाला दंड लागू शकतो. आज कोणत्याही प्रकारचे कॉस्मेटिक किंवा ब्युटी क्रीम वापरताना थोडी काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला काही प्रकारची ऍलर्जी होऊ शकते. आज तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकतात. आज तुमचं आरोग्य देखील ठिक असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Maghi Ganesh Jayanti : गणपती बाप्पा मोरया! माघी गणेश जयंतीला मुंबईतील 'या' प्रसिद्ध मंदिरांचं घ्या दर्शन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget