एक्स्प्लोर

Horoscope Today 12 October 2024 : दसऱ्याचा शुभ दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 12 October 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 12 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope) 

नोकरी (Job) -  ज्यांना नुकतीच नवीन नोकरी मिळाली आहे, त्यांनी सतत रजा घेऊ नका. अन्यथा, तुमच्या नोकरीवरही परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या ऑफिसमध्ये तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते.

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने खूप मेहनत केली तर ते डील मिळवू शकतात ज्यासाठी ते बरेच दिवस प्रयत्न करत होते. 

तरुण (Youth) - बाहेरील व्यक्ती तरुणांचे मन दुखवू शकते, म्हणून तुम्ही कोणाचेही बोलणे मनावर घेऊ नका. अन्यथा तुम्हाला मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. तुमच्या पालकांशी बोला, तुमच्या पालकांना उद्या एकटे वाटू शकते. 

आरोग्य (Health) - आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जास्त कामामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो, त्यामुळे तुमची प्रकृतीही बिघडेल. ण्याच्या सवयींमध्ये थोडे संतुलन ठेवा आणि तळलेले अन्न खाणे टाळा.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) -  नोकरीच्या ठिकाणी काम करताना थोडा गोंधळ होईल.  तुमच्या वरिष्ठांचा सल्ला घ्या, कारण तुम्ही जितक्या लवकर तुमच्या वरिष्ठांचा सल्ला घ्याल तितक्या लवकर तुमचे काम पूर्ण होईल.

व्यवसाय (Business) - जे लोक आपला वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात त्यांनी आपल्या वडिलांच्या सल्ल्यानेच पुढे जावे, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. 

आरोग्य (Health) - मज्जासंस्थेशी संबंधित काही समस्या आज देऊ शकतात, जर तुम्हाला जुनाट समस्या असेल तर तुम्हाला  आराम मिळेल. आराम मिळत नसेल तर बेफिकीर राहू नका, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - जे बँकिंग क्षेत्राशी निगडीत आहेत ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या पदोन्नतीबद्दल बोलू शकतात आणि तुमचे वरिष्ठ  तुमच्यावर खूश होऊन तुम्हाला बढती देऊ शकतात.

व्यवसाय (Business) -व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर तुमच्या पार्टनरच्या सल्ल्याशिवाय कोणतेही काम करू नका. 

तरुण (Youth) - आपले कौशल्य अद्ययावत करण्याचे नियोजन केले पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकता.  तुम्ही तुमच्या घराच्या अग्निशमन यंत्रणेची थोडी काळजी घ्यावी, यासोबतच स्वयंपाकघरात काम करताना थोडी काळजी घ्या. 

आरोग्य (Health) - तुमच्या डोळ्यांची थोडी काळजी घ्या, कारण तुम्हाला डोळ्यात पाणी येणे किंवा जळजळ होणे इत्यादीमुळे खूप त्रास होऊ शकतो.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये सहकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुमची प्रगती होईल. 

व्यापार (Business) - आज तुम्हाला व्यापाऱ्याशी संबंधित तोटा होऊ शकतो. अशा वेळी जास्त ताण न घेता कामाचाच एक भाग म्हणून सोडून द्या.  

तरूण (Youth) - घराबाहेर पडताना घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा नेहमी आशीर्वाद घ्या. तुमची सगळी कामं पूर्ण होतील. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. पण म्हणून तुम्ही तुमच्या जुन्या दिर्घकाली आजाराकडे दुर्लक्ष करू नका. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

नोकरी (Job) - तुम्हाला आज कदाचित प्रमोशनची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूप उत्साही असाल. 

व्यापार (Business) - आज व्यवसायात कोणताही मोठा निर्णय एकट्याने घेऊ नका. वरिष्ठांचा योग्य सल्ला घ्या. 

तरूण (Youth) - आज तुमचं पूर्णपणे लक्ष समाजसेवा करण्यात असू शकतं. तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल.

आरोग्य (Health) - तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. ऑफिसमधलं वातावरणही चांगलं राहील.

व्यापार (Business) - जर तुम्ही व्यवसायात काही नवे बदल आणू इच्छित असलात तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल.

तरूण (Youth) - प्रेमसंबंधात तुमचं सगळं व्यवस्थित सुरु राहणार आहे.  तुम्हाला जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. 

आरोग्य (Health) - दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी आज जरा जास्त काळजी घ्यावी. पथ्यपाणी सांभाळा. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

नोकरी (Job) - जे लोक मार्केटिंग क्षेत्रात काम करतायत त्यांना आज चांगला नफा मिळेल. तुमच्या कामावर बॉसदेखील खुश असेल. 

व्यवसाय (Business) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे तुम्ही देखील खुश असाल. 

युवक (Youth) - तुमच्या आसपास असलेल्या मुक्या प्राण्याची, पक्ष्याची सेवा केल्यास तुम्हाला त्यातून चांगलं पुण्य मिळू शकतं. 

आरोग्य (Health) - आज कोणत्याही ताणतणावापासून दूर राहा. कारण हा तणाव तुम्हाला शारीरिकच नाही तर मानसिकरित्याही कमजोर बनवेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

नोकरी (Job) - जर तुमचं ऑनलाईन का असेल तर तुमचा डेटा योग्यरित्या सांभाळून ठेवा. अन्यथा, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला ओरडा मिळू शकतो.  

व्यवसाय (Business) - आज कोणताही कागदोपत्री व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रं नीट वाचून घ्या. मगच सही करा. 

कुटुंब (Family) - आज कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांशी नीट संवाद साधा. उद्धट बोलू नका. अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. 

आरोग्य (Health) - जर तुम्हाला किडनीच्या संबंधित आजार असल्यास वेळेवर औषधं घ्या. अन्यथा तुम्हाला हा आजार त्रास देऊ शकतो.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. परदेशातून तुम्हाला नोकरीची ऑफर मिळू शकते. 

व्यवसाय (Business) - आज व्यवसायिकाने सरकारी टॅक्स भरण्याच्या कामात अजिबात दिरंगाई करू नये. अन्यथा तुम्हाला ती महागात पडू शकते. 

युवक (Youth) - तरूणांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रामाणिकपणे करावा. तरच तुम्हाला भविष्यात यश मिळू शकतं. 

आरोग्य (Health) - आज डोकेदुखीच्या त्रासाने तुम्ही खूप त्रस्त असाल. यासाठी वेळेवर विश्रांती घ्या. अपुऱ्या झोपेमुळे हा त्रास होऊ शकतो. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतत जास्त मेहनत करावी लागू शकते. यामुळे तुम्हाला सतत सांधेदुखी जाणवू शकते.

आरोग्य (Health) - आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आजारणामुळे सतत चिंता, थकवा यांरखे त्रास तुम्हाला उद्बवू शकतात.            

व्यवसाय (Business) - आज पूर्णपणे तुमचं तुमच्या कामावर लक्ष असेल.  पैसे कसे कमावायचे हाच विचार तुम्ही कराल. 

तरूण (Youth) - तरूण विद्यार्थ्यांचा ओढा नोकरीपेक्षा जास्त व्यवसायाकडे वळताना दिसेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

नोकरी (Job) - आज तुम्हाला ऑफिसमध्ये चांगला मान-सन्मान मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.                                                                             
आरोग्य (Health) -  तुमच्या आरोग्याची तुम्ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा, सर्दी, खोकल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. 

तरूण (Youth) - स्पर्धा परीक्षेला बसलेले विद्यार्थी परीक्षेत चांगलं यश मिळवतील. तसेच चांगली नोकरीही करतील. 

कुटुंब (Family) - आज दूरच्या नातेवाईकांडून तुम्हाला चांगली शुभवार्ता मिळू शकते. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकाऱ्यांकडून चांगला आशीर्वाद मिळू शकतो. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल. कोणत्याच प्रकारे शारीरिक कष्ट घेऊ नका. 

व्यवसाय (Business) - तुमचा व्यवासाय आहे त्यापेक्षा पुढे नेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहभाग मिळेल.

तरूण (Youth) - तरूणांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ती म्हणजे वाहन चालवताना जास्त वेगाने गाडी चालवू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 12 October 2024 : विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर 'या' 5 राशींना मिळणार कर्माचं फळ; पैशांची आवक वाढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रियाWalmik Karad Mcoca : वाल्मिक कराडवर मकोका, कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Suresh Dhas on Walmik Karad MCOCA : अखेर वाल्मिक कराडवर मकोका, टीकेचे राण पेटवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अखेर वाल्मिक कराडांवर मकोका अंतर्गत गुन्हा, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Embed widget