एक्स्प्लोर

Horoscope Today 12 July 2024 : आजचा शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? कोणाला मिळणार लाभ तर कोणाला होणार तोटा? आजचे राशीभविष्य

Horoscope Today 12 July 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 12 July 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - जर तुम्ही आज नोकरी संदर्भात मुलाखत देणार असाल तर नीट तयारी करून जा. ओव्हर कॉन्फिडन्स तुमच्या कामात अडथळा आणू शकतो. 

व्यापार (Business) - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा तर्क वितर्क करू नका.

कुटुंब (Family) - कौटुंबिक समस्यांमध्ये मत व्यक्त करताना विचार विनिमय करून द्या. तुमच्या वक्तव्यामुळे समोरची व्यक्ती नाराज होऊ शकते.

आरोग्य (Health) - आज प्रवास करताना सावधगिरीने करा. कारण मध्ये येणारे अडथळे फार आहेत. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - शिक्षकी पेशात जे नोकरदार नोकरी करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. 

व्यापार (Business) - आज व्यवसायाशी संबंधित कोणतीही चिंता तुम्हाला नसणार. तुमचा व्यवसाय चांगला चालतोय. तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळतोय. 

आरोग्य (Health) - तुमच्या छोट्यातल्या छोट्या आजारांची कल्पना डॉक्टरांना द्या. कोणताही त्रास लपवून ठेवू नका. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. 

आरोग्य (Health) - जर तुम्ही अनेक दिवसांपासून आजारी असाल तर हळूहळू तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल. 

व्यापार (Business) - व्यवसायात तुम्ही जो लोकांना विश्वास दिला आहे. त्यावर ठाम राहा. अन्यथा मार्केटमध्ये तुमचं नाव खराब होऊ शकतं.  

विद्यार्थी (Students) - आज एखाद्या कारणावरून तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. जास्त विचार करणे टाळा. 

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - सरकारी खात्याशी संबंधित आहेत किंवा कोणत्याही सरकारी पदावर काम करतात, त्यांना बदलीचे पत्र मिळू शकते, ज्यामध्ये त्यांना त्यांचे इच्छित स्थानही मिळू शकते. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी त्यांच्या ग्रहांचा विचार करून जमिनीत गुंतवणूक करावी, त्यांना त्यात मोठा नफा मिळू शकतो. जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, जर तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकत नसाल तर तुम्ही छोटी गुंतवणूक करू शकता.

तरुण (Youth) - तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाइकांशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे तुमचे नाते अधिक चांगले होईल

आरोग्य (Health) - पाठदुखी तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. यामुळे तुम्हाला नियमितपणे योगा करावा लागू शकतो

सिंह रास (Leo Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्ही तुमची जबाबदारी चोख पार पाडत असताना तुमचा कार्यालयीन डेटा सुरक्षित ठेवावा. तुमच्याकडून महत्त्वाच्या गोष्टी गहाळ होण्याची शक्यता आहे.  

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांसाठी सामान्य असेल. त्यांना जास्त नफा मिळेल आणि तोटा नाही. तुमचा दिवस चांगला जाईल. 

तरुण (Youth) -  क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला दान केले पाहिजे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही त्यांना काही धान्य दान देखील करू शकता. तुमच्या विनाकारण बोलण्याने तुमच्या घरातील वातावरण बिघडू शकते 

आरोग्य (Health) - त्वचेच्या आजारांचा त्रास होऊ शकतो, म्हणूनच कोणत्याही प्रकारचे कॉस्मेटिक वापरण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

नोकरी (Job) -  प्रामाणिकपणे काम करा. कामात हलगर्जीपणा करु नका.

व्यवसाय (Business) - पूर्वनियोजित योजना अंमलात आणू शकता. जे तुमच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

तरुण (Youth) - तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात, त्यांचा सल्लाही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

आरोग्य (Health) - आवश्यकतेपेक्षा जास्त मेहनत करणे देखील तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही, तुमचे आरोग्य बिघडू शकते. 

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज ऑफिसमध्ये तुमचे तुमच्या बॉसशी अनावश्यक गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. आज अजिबात वाद घालू नका.  

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, स्टेशनरीचा व्यवसाय केल्यास तुम्हाला आज चांगला नफा मिळू शकतो.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करा. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला डोकेदुखीमुळे खूप त्रास होऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे काळजी वाटत असेल तर आधी पूर्ण विश्रांती घ्या आणि मगच कोणतंही काम करा.

वृश्चिक रास ( Scorpio Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. भूतकाळातील चुकांमधून तुम्ही शिकलं पाहिजे. त्याच त्याच चुका पुन्हा करू नका.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तर चांगलं होईल. व्यवसायाशी संबंधित स्पर्धेमुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

विद्यार्थी (Student) - आज तरुण खूप उत्साहाने आणि आनंदाने जगतील. आज तुमचे कामही तितक्याच सहजतेने होईल. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम केल्यास तुमचं काम लवकर पूर्ण होऊ शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, सोने-चांदीचा व्यवसाय करणारे लोक त्यांच्या आर्थिक ताकदीने कामात यश मिळवून खूप आनंदी राहतील.

विद्यार्थी (Student) - तुम्ही आज सहलीला जाऊ शकतात, परंतु तुम्ही प्रवासादरम्यान थोडी काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला तुमच्या सामानाचे संरक्षण स्वतः करावं लागेल.

आरोग्य (Health) - तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काम करू नये. तुमच्या पाय आणि कंबरेला सूज येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही खूप काळजीत पडू शकता.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

नोकरी (Job) - आज ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. 

व्यवसाय (Business) - व्यापारात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. समाजात तुमचं कौतुक होईल. 

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला भूतकाळातील जुन्या गोष्टी आठवतील. या गोष्टी आठवून तुम्हाला भावूक व्हायला होईल. 

आरोग्य (Health) - बदलत्या वातावरणाचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिकल राहून काम करणं अपेक्षित आहे. अन्यथा लोक तुमच्या स्वभाचा गैरफायदा घेऊ शकतात.

व्यवसाय (Business) - आज तुमचे विरोधक तुमचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतील. पण, तुम्ही त्यांच्या बोलण्यात फसू नका. 

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही तुमच्या मनासारख्या गोष्टी करण्यास खूप उत्सुक असाल. आजचा दिवस तुम्ही मनासारखा जगाल. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला अति तणावामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. 

मीन रास (Pisces Horoscope Today)

नोकरी (Job) - तुमची निर्णयक्षमता चांगली असल्या कारणाने कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेले निर्णय कंपनीसाठी लाभदायक ठरू शकतात. तुमची जिद्द आणि तुमचे विचार याचं ऑफिसमध्ये खूप कुतूहल असेल. 

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास गेले अनेक दिवस तुमच्या ज्या कोर्ट-कचेऱ्या सुरु होत्या त्याला आज यश येणार आहे.

विद्यार्थी (Student) - इतरांची जीवनशैली फॉलो करण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा तुम्ही तुमच्याच कुटुंबीयांसाठी अडचणी निर्माण करू शकता. 

आरोग्य (Health) - तुमची तब्येत ठणठणीत असणार आहे. फक्त कोणत्याच गोष्टीचा ताण घेऊ नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 12 July 2024 : मेष, कन्यासह 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; इतर राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
Satara Voting Percentage : साताऱ्यातील आठ मतदारसंघात चुरशीच्या लढती, कराड दक्षिण, कराड उत्तरसह पाटणला जोरदार मतदान
साताऱ्यात कराड उत्तर, कराड दक्षिण सह पाटणमध्ये सर्वाधिक मतदान, सर्वात कमी मतदान कुठं? जाणून घ्या आकडेवारी
Maharashtra Assembly Election 2024 : मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान; गडचिरोलीने मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती?
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान; गडचिरोलीने मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Koli on Praniti Shinde : केसाने गळा कापला,खंजीर खुपसला, प्रणिती शिंदेंवर शरद कोळी संतापलेNitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 20 November 2024Hitendra Thakur : तावडेंची अवस्था भिजलेल्या कोंबडी सारखी होती, ठाकूर पुन्हा बरसले ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
Satara Voting Percentage : साताऱ्यातील आठ मतदारसंघात चुरशीच्या लढती, कराड दक्षिण, कराड उत्तरसह पाटणला जोरदार मतदान
साताऱ्यात कराड उत्तर, कराड दक्षिण सह पाटणमध्ये सर्वाधिक मतदान, सर्वात कमी मतदान कुठं? जाणून घ्या आकडेवारी
Maharashtra Assembly Election 2024 : मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान; गडचिरोलीने मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती?
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी मतदान; गडचिरोलीने मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Embed widget