Horoscope Today 08 August 2024 : आज 'या' राशींवर राहणार दत्तगुरुंची कृपा; मनातील सर्व इच्छा होणार पूर्ण, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Horoscope Today 08 August 2024 : तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 08 August 2024 : पंचांगानुसार, आज 8 ऑगस्ट 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आज श्रावणातील चौथा दिवस म्हणजेच गुरुवार आहे. तसेच ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
बेकार तरुणांना काम मिळेल. नवीन नोकरी लागेल. महिलांना आपल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
एखाद्या गोष्टीत वाहून न जाता तटस्थपणे विश्लेषण करणे आज तुम्हाला चांगले जमेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
तुमचा सल्ला घेण्यासाठी लोक तुमच्याकडे येतील. तुमच्या बुद्धीच्या जोरावर अनेक कामांचा फरशा पाडाल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्याकडचा उत्साह इतरांनी उसना घ्यावा अशी परिस्थिती निर्माण होईल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
राजकारणातील लोकांना आपला प्रभाव जनतेवर पडण्यासाठी उत्तम काय आहे.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
सत्ता आणि मान याचे आकर्षण राहील. नोकरीमध्ये अधिकाराच्या जागेवर तुमची वर्णी लागेल
तुळ रास (Libra Horoscope Today)
जबाबदारीची कामे अंगावर पडतील. सतत काहीतरी कामे करावी लागल्यामुळे थकल्यासारखे वाटले तरी उत्साही राहाल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
खेळाडू लोकांना वेगवेगळ्या संधी मिळतील. विद्यार्थी स्वतःच्या मनाप्रमाणे काम करतील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
वैचारिक दृष्ट्या बरेच स्थिर राहाल आणि चांगल्यापैकी दूरदृष्टी ठेवाल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आर्थिक लाभ चांगले मिळतील. परिस्थिती सुधारल्यामुळे मनावरचा ताण हलका होऊन जाईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
वर्षा हक्काने मिळणारे इस्टेटी ची कामे मार्गी लागतील. ज्यांना मूत्राशयाचे विकार आहेत त्यांनी वेळेवर औषधोपचार घ्यावेत
मीन रास (Pisces Horoscope Today)
स्त्रियांना मासिक पाळीचे त्रास संभवतात. घरामध्ये हलकेफुलके वातावरण राहिल्यामुळे आनंदात भर पडेल
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: