एक्स्प्लोर

Horoscope Today 06 August 2024 : आज मंगळागौर; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 06 August 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 06 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. 

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आनंद होईल. 

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे कसा नेता येईल. याचा सतत तुम्ही विचार कराल. 

कुटुंब (Family) - तुमच्या कुटुंबात आज आनंदाचं वातावरण असेल. कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा विचार तुमच्या मनात येईल. 

आरोग्य (Health) - आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करावा. 

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप ताण असेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल.

आरोग्य (Health) - आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा. 

व्यवसाय (Business) - आज तुमची व्यवसायातील आर्थिक स्थिती आधीपेक्षा फार चांगली असणार आहे. काम करण्यास उत्साह असेल.

युवक (Youth) - तरूणांनी मेहनत करत राहणं गरजेचं आहे. एक ना एक दिवस यश नक्की तुम्हाला मिळेल. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्हाला प्रोत्साहन, मार्गदर्शन देतील. तसेच, नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येईल. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका. 

व्यवसाय (Business) - आज महिला व्यापाऱ्यांनी आपल्या कामात सावध राहणं गरजेचं आहे. कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतं. 

युवक (Youth) - मित्रांच्या सहकार्याने आज तुमची अनेक कामं सहज साध्य करता येईल. मित्रांचं ऋण तुम्ही आयुष्यभर फेडाल.

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या कामावर तुम्हाला अपेक्षित यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. जर तुम्ही आत्मविश्वासाने काम केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचं उत्पन्न वाढू शकतं.

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, जे त्यांचे वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात त्यांना अधिक फायदा होऊ शकतो.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही तुमची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही चढउतार जाणवू शकतात. किरकोळ समस्यांमुळेही तुम्ही चिंतेत पडू शकता. डॉक्टरांकडून स्वतःवर योग्य उपचार करुन घ्या.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्हाला काही समस्यांनी घेरलं जाऊ शकतं. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामाकडे नीट लक्ष द्या. आज तुमच्या हातून काही चूक घडू शकते.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, काम करताना व्यावसायिकांनी त्यांच्या ग्राहकांकडून त्यांच्या सेवेचा फीडबॅक घेणं आवश्यक आहे, फीडबॅकनुसार तुम्ही तुमच्या कामात बदल करू शकता.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. तरुणांनी आपला वेळ भगवान शंकराच्या पूजेसाठी द्यावा, यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, टेन्शन फ्री होण्यासाठी मॉर्निंग वॉक, योगा करा, यामुळे तुम्हाला नक्कीच फायदे होतील.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुम्ही जर सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर तुमच्यावर आज कामाचा बोजा खूप असू शकतो, ज्यामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर काही गैरसमजामुळे तुमच्या व्यवसायातील भागीदाराशी तुमचं नातं बिघडू शकतं.

विद्यार्थी (Student) - तरुणांना आज विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार होत नाही. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा.

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काम करताना तुमच्या डोक्याचा खूप वापर करावा लागेल. तुमच्या बुद्धीने तुम्ही अनेक कामं पूर्ण कराल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यापारी वर्गाने आज कोणत्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळावं, कारण ग्रहण बदलल्यामुळे तुमच्या जीवनात कर्जाबाबत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

विद्यार्थी (Student) - तुमच्या परीक्षा जवळ आल्या असतील तर तुम्ही परीक्षेची तयारी अधिक जोमाने करायला हवी.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, दमा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना आणखी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, म्हणूनच तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडं सतर्क राहिलं पाहिजे. 

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग करणाऱ्या लोकांवर आज कामाचा ताण खूप वाढू शकतो, तो चांगल्या प्रकारे सांभाळणं तुमच्यासाठी एक आव्हान असेल. बाकीच्यांना ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचं तर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी आज चांगली सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतात. ग्राहकांची संख्या वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल, तुमच्याकडे जेवढे ग्राहक असतील तेवढा तुमचा व्यवसाय उत्तम चालेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, आज त्यांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पण तुम्ही तुमच्या बुद्धीने या समस्यांवर सहजतेने मात कराल, आज तुमचा पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने खूप खर्च होऊ शकतो.

आरोग्य (Health) - आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल बेफिकीर न राहिल्यास बरं होईल. किरकोळ समस्या आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज तुम्हाला ऑफिसला जाण्याचा फायदा मिळू शकतो. तसेच, तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील, ते तुमच्यावर खूश असतील आणि तुमचा पगार वाढवतील.  

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ चांगला असेल. आज तुम्ही जी कोणती डील कराल त्यात तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळू शकेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

विद्यार्थी (Student) - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आईवडिलांकडून तुम्हाला फटकारलं जाऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा खोकल्याची समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते, त्यामुळे अगदी क्षुल्लक समस्या असतानाही निष्काळजीपणा करू नका, उलट डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, नोकरदार लोकांनी नशिबावर अवलंबून राहू नये आणि नोकरीसाठी प्रयत्न करत राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते, ज्यातून त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, गुंतवणूकदारांनी व्यवसायात केलेली गुंतवणूक त्यांना भरघोस नफा मिळवून देईल, ज्यामुळे जुनं नुकसान भरून काढलं जाईल.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमच्या मुलांना फोन आणि इंटरनेटवर जास्त सक्रिय होऊ देऊ नका, त्यांना खेळांशी ओळख करून द्या आणि त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करा.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या त्रास देऊ शकते. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, कामावर अनावश्यक कामांमध्ये आपला वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. नोकरीत कोणत्याही कागदावर सही करण्यापूर्वी सर्व कायदेशीर कागदपत्रं काळजीपूर्वक वाचा.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायात काही मोठा खर्च होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या पैशाचा ओघ कमी होईल. तुमचं मन क्लियर असेल तेव्हाच तुम्ही व्यवसायात ध्येय गाठू शकाल.

कौटुंबिक (Family) - तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी दिवस खूप महत्त्वाचा असेल, कारण कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. ग्रहदोष निर्माण झाल्यामुळे तुमची कामं बिघडतील. तुमच्या फ्रेंड सर्कलमधील कोणाशी तरी तुमचे वाद होऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घ्या.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुमच्या नोकरीसोबत अतिरिक्त उत्पन्नासाठी तुम्ही पार्ट टाईम जॉब किंवा ऑनलाईन फ्रीलान्सिंग करू शकाल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होईल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल, तुमची आज चांगला कमाई होईल. सणामुळे आज तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, आज तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही खूप मज्जा कराल, परंतु यासोबत अभ्यासावरही लक्ष द्यावं

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यान करावा आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Mangala Gauri 2024 : उद्या श्रावणातील पहिली मंगळागौर; कशी करावी स्थापना? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget