एक्स्प्लोर

Horoscope Today 02 August 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 02 August 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 02 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. 

मेष रास (Aries Horoscope Today)

नोकरी (Job) - जर तुम्ही सोशल मीडियाशी कनेक्ट असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल, लोकांना तुमची कव्हर स्टोरी आवडू शकते.

व्यवसाय (Business) - आज व्यावसायिकांना सरकारी लाभ मिळू शकतात किंवा तुम्ही कोणत्याही सरकारी टेंडरसाठी अर्ज केला असेल, तर ते टेंडरही पास होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल.

विद्यार्थी (Student) - तरुणांसाठी आजचा दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता राखण्यात यश मिळेल.

आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आज तुमचा रक्तदाब वाढू शकतो, त्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी ऑफिसमध्ये चांगला राहील. तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या बॉससोबत तुमच्या नात्यात अधिक गोडवा येईल, ज्यामुळे तुमची बढतीही होऊ शकते.

व्यवसाय (Business) - जर व्यावसायिकांवर कोणतंही कर्ज असेल तर तुम्ही आज ते फेडण्याचा विचार करू शकता आणि तुमचं कर्ज लवकरच माफ होईल.

विद्यार्थी (Student) - तुमची इच्छा नसतानाही आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटचा भाग बनू शकणार नाहीत.

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं राहील. जर तुम्हाला तुमची तब्येत बिघडल्याचं जाणवत असेल तर लवकरच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुम्हाला लवकरच आराम मिळू शकेल.

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्ही नवीन नोकरीसाठी मुलाखतीला जात असाल तर तुम्ही श्रीगणेशाचा आशीर्वाद अवश्य घ्या, तुमचं सर्व कार्य यशस्वी होईल.

व्यवसाय (Business) - आजचा दिवस व्यावसायिकांसाठी सामान्य असेल, त्यांना जितका नफा मिळेल, तितकाच फायदा होईल.

विद्यार्थी (Student) - स्पर्धात्मक परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी सजग राहून तयारीला सुरुवात करावी आणि शिक्षकांच्या सल्ल्याचं पालन करावं. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य काहीसं कमजोर असेल. आज ज्येष्ठांना सांधेदुखीचा त्रास होईल, रोज तेलाने मसाज करत राहिल्यास आराम मिळेल. 

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी तसेच कामात दिवस चांगला जाण्यासाठी देवाची पूजा आराधना करा. 

व्यवसाय (Business) - आज कोणताही आडपर्दा न ठेवता सगळे एकत्र काम करताना दिसतील. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला चालेल. 

तरुण (Youth) - पैसे कमावण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात खासकरून सोशल मीडियाचा वापर करत असाल तर त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. 

आरोग्य (Health) - आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वातावरण बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लाईट आहारच घ्या. 

सिंह रास (Leo Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही केलेल्या कामाचा आज तुम्हाला लाभ मिळेल. अचानक धनलाभ होईल. 

व्यवसाय (Business) - व्यवसायासाठी किंवा नवीन प्रोजेक्टसाठी तुम्ही तुमची जी काही जमापुंजी साठवली होती ती आज खर्च होऊ शकते. 

तरुण (Youth) - आज तुम्ही जे कोणतेही प्लॅन करत असाल ते नीट विचार करूनच करा. तरच तुम्हाला त्यात यश येईल.

आरोग्य (Health) - जर तुम्ही यात्रा करण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्रवास सुखाचा होईल. फक्त मनात भीती ठेवू नका. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

नोकरी (Job) - जर तुम्हाला तुम्ही ठरवलेलं ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी आजपासूनच तयारीला लागा. तरच तुम्हाला यश मिळेल. 

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्हाला ग्राहकांच्या मागणीनुसार व्यवसायात बदल करायला हवा. तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. 

तरुण (Youth) - जे तरूण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करतायत  त्यांनी आपल्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे.  

आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत सामान्य असणार आहे. तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. फक्त तुमची औषधं वेळेवर घ्या. 

तूळ रास (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुमचे विरोधक तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात, परंतु तुम्ही त्यातून सुटू शकता आणि तुमचा विरोधक स्वतः त्या कटात अडकू शकतो.

व्यवसाय (Business) - आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठी संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक चांगला होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. 

विद्यार्थी (Student) - तरुण आपल्या कौशल्याने काही मोठं काम करून यश मिळवू शकतात, त्यात तुमची आर्थिक स्थितीही मजबूत असेल.

आरोग्य (Health) - जर तुम्ही खूप दिवसांपासून मानसिक तणावातून जात असाल तर आज हा ताण कमी होऊ शकतो. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - आज तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडथळ्यामुळे काम थांबेल, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं.

व्यवसाय (Business) - आज तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगलं काम कराल, तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.

विद्यार्थी (Student) - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु बाहेरील कोणत्याही प्रकारचं अन्न खाणं टाळावं, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.

व्यवसाय (Business) - शुभ योग तयार झाल्यामुळे व्यवसायात लाभ होईल. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे.

विद्यार्थी (Student) - सीएस आणि आयटीच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं नियोजन करावं.

आरोग्य (Health) - तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं.

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, नोकरीत यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, तरच तुमची प्रगती होईल. 

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आळशीपणाने भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी वाटू शकते, त्यामुळे तुम्हालाही अडकल्यासारखं वाटू शकतं.

आरोग्य (Health) - तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तणावपूर्ण गोष्टींपासून दूर राहा, अन्यथा तुमची डोकेदुखी वाढू शकते. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस ऑफिसमध्ये तुमच्यासाठी अनुकूल असेल, तुमची नियोजित कामं तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकाल. 

व्यवसाय (Business) - आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.  

कुटुंब (Family) - तुमच्या मुलाच्या भवितव्याबद्दल तुम्ही थोडे चिंतित असाल. तुमच्या जीवनात यश मिळवण्यासाठी अनावश्यक भांडणांपासून दूर राहा.

आरोग्य (Health) - आज मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणं सुटू शकतात, ज्यामुळे तुम्हाला खूप मानसिक शांती मिळेल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे काही सहकारी तुमच्या कामाच्या शैलीवर खूश नसतील, परंतु ते तुम्हाला सांगणार नाहीत, उलट ते तुम्हाला अपमानित करण्याची संधी शोधतील.

व्यवसाय (Business) - जर तुम्ही तुमच्या व्यवसायात पैसे गुंतवायचे ठरवले असेल तर तुम्ही थोडा विचार केला पाहिजे आणि मगच कोणतीही गुंतवणूक करा. 

विद्यार्थी (Student) - तुमचं करिअर चांगलं करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, तरच तुम्ही यश मिळवू शकता. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य नीट राखण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक केला पाहिजे, ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आणि शिळं अन्न खाणं टाळा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 02 August 2024 : आजचा दिवस खास! 'या' राशींना मिळणार मेहनतीचं फळ, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akhilesh Shukla Arrested Kalyan | कल्याण घटनेतील आरोपी अखिलेश शुक्लाला अटकSantosh Deshmukh Case | माझ्या भावाचे मारेकऱ्यांना जेरबंद करा, संतोष देशमुखांच्या भावाची आर्त हाकAaditya Thackeray Meet Pravin Darekar : हसले, खिदळले, फोटो काढले; दरेकर आदित्य ठाकरेंना काय बोलले?Anna Bansode Pimpri-Chinchwad : मंत्रिपद मिळालं नाही, अण्णा बनसोडे नाराज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Ravichandran Ashwin: तर मला हार्ट अटॅक आला असता...आर. अश्विन कॉल हिस्ट्री शेअर करत हे काय बोलून गेला? 
सचिन अन् कपिल देवचं नाव घेतलं, स्क्रीन शॉट शेअर केला, अश्विन म्हणाला तेव्हा मला हार्ट अटॅक आला असता....
संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली
संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली
Gold Rate Update : सोने दरात MCX वर तेजी पण सराफा बाजारात घसरण, 300 पासून 650 रुपयांपर्यंत दर घसरले
सोने दरात मोठी घसरण, चांदीचे दरही घसरले, MCX अन् सराफा बाजारात वेगळं चित्र
मनसेनं थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
मनसेनं थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
Embed widget