Hindu Religion: नवीन वर्षात सर्व कामात यश हवंय? 2024 संपण्यापूर्वी फक्त 'हे' उपाय करा, जे फार कमी लोकांना माहित, शनिदेव होतील खूश!
Hindu Religion: जर तुम्हालाही नवीन वर्षात तुमचे नशीब उजळवायचे असेल आणि तुमची सर्व कामे सहजतेने व्हावीत असे वाटत असेल तर आज काही सोपे उपाय जाणून घ्या, ज्याने तुमचे नशीब खुलते.
Hindu Religion: नवीन वर्षाची सुरूवात लवकरच होणार आहे. 2024 ला निरोप आणि 2025 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षात प्रत्येक व्यक्तीला आशा असते की, या वर्षी आपले नशीब आपल्याला साथ देईल आणि सर्व कामे योग्य प्रकारे पार पडतील. पण ते काही लोकांसाठी आनंद आणि इतरांसाठी त्रास देते. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, जे फार कमी लोकांना माहित आहेत. हे उपाय केल्याने शनिदेवही खूश होतील. आणि त्यांची कृपा तुमच्यावर होईल..
तुम्हालाही नवीन वर्षात तुमचे नशीब उजळवायचे असेल तर...
ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षाची सुरूवात होताना लोकांवर ग्रह-ताऱ्यांचे अनेक शुभ-अशुभ प्रभाव दिसून येतात. अशात जर तुम्हालाही नवीन वर्षात तुमचे नशीब उजळवायचे असेल आणि तुमची सर्व कामे सहजतेने व्हावीत असे वाटत असेल तर तुम्हाला काही उपाय करावे लागतील. जेणेकरून तुमचे नशीब खुलेल. जाणून घेऊया ज्योतिषाकडून उपाय...
नवीन वर्षात यश मिळवण्यासाठी उपाय करा
ही वस्तू बजरंगबलीला अर्पण करा
ज्योतिषी सांगतात की, शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी शनिवारी हनुमानजींना चमेली आणि सिंदूर अर्पण करा. तसेच हनुमान चालिसाचे पठण करावे. याने शनिदेवाच्या प्रकोपापासून बचाव होऊ शकतो. असे मानले जाते की, जो भक्त हनुमानाची पूजा करतो त्याला शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागत नाही.
हे तेल शनिदेवाला अर्पण करावे
प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिदेवाच्या चरणी काळे तीळ आणि तेल लावावे. तिळाचे तेल दान करणे उत्तम आहे असे मानले जाते. यासाठी तेलाच्या भांड्यात आपला चेहरा पाहा आणि नंतर ते तेल एखाद्याला दान करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.
ही फुले शनिदेवाला अर्पण करा
दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला निळी फुले अर्पण करा. चुकूनही पूजेदरम्यान शनिदेवाची मूर्ती प्रत्यक्ष पाहू नये. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शनिवारी विधीनुसार त्यांची पूजा करावी.
हे काम पिंपळाच्या झाडाखाली करा
दररोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून, त्याची पूजा करून आणि पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घातल्याने शनिदेव प्रसन्न होतात. तसेच या दिवशी एखाद्या गरीबाला भोजन दिल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि गरिबी दूर होते. याशिवाय शनिवारी सूर्योदयानंतर निर्जन ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावणे खूप शुभ असते. हे पैशाशी संबंधित प्रभाव दूर करते.
हेही वाचा>>>
Garud Puran: मृत्यूनंतर नरकातील 'या' शिक्षा माहित आहेत? गरुडपुराणात नरकाचे किती प्रकार सांगितलेत? वाईट कृत्य करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )