Adhik Maas 2023 : यंदा 13 महिन्यांचं असणार हिंदू कॅलेंडर! श्रावणात 4 नव्हे 8 सोमवार असतील, जाणून घ्या दुर्मिळ योगायोगाचे कारण
Adhik Maas 2023 : हिंदू कॅलेंडरनुसार 2023 या वर्षात 12 नव्हे तर 13 महिने असतील. याला अधिक मास म्हणतात. त्यामुळे उपवास आणि सणांच्या तारखेत बदल होणार आहे.
Adhik Maas 2023 : 1 जानेवारीपासून नवीन वर्ष 2023 सुरू झाले आहे. परंतु हिंदू कॅलेंडर 12 ऐवजी 13 महिन्यांचा असेल. या वर्षात महादेवाचा श्रावण एक महिना नाही तर दोन महिने असणार आहे. यानुसार 2023 मध्ये आणखी काही महिने असतील. अधिक मास किंवा मलमास असेही म्हणतात.
2023 मध्ये असा दुर्मिळ योगायोग
ज्योतिषशास्त्रानुसार 2023 मध्ये अतिरिक्त महिन्यामुळे व्रत आणि सणांच्या तारखांमध्ये बदल होणार आहे. यंदा श्रावणात 4 नव्हे तर 8 सोमवार असतील आणि चातुर्मास 5 महिन्यांचा असेल. याआधी असा योगायोग 2004 मध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. 19 वर्षांनंतर 2023 मध्ये असा दुर्मिळ योगायोग घडत आहे. मलमासमुळे उपवास आणि सणांच्या तारखांमध्ये काय बदल झाला आहे, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
अधिक मासाची गणना कशी केली जाते?
अधिक मासामुळे, 2023 मध्ये सणांच्या तारखांमध्ये बदल झाला आहे. परंतु सर्व प्रथम अधिक मासाची गणना कशी केली जाते हे जाणून घेणे आवश्यक आहे. पंचांगाच्या आधारावर, प्रत्येक तिसऱ्या वर्षात एक महिना अधिक असतो, ज्याला अधिक मास म्हणतात.
एक सौर वर्ष 365 दिवस आणि 6 तासांचे असते आणि चंद्र वर्ष 354 दिवसांचे असते. सौर वर्ष आणि चंद्र वर्षातील फरक समान करण्यासाठी दर तिसऱ्या वर्षी एक चंद्र महिना जोडला जातो. याला मलमास म्हणतात. हिंदू धर्मात मलमास दरम्यान शुभ कार्ये निषिद्ध आहेत. 2023 मध्ये मालमास 18 जुलै 2023 पासून सुरू होत आहे.
कधीपासून सुरू होणार अधिकमास?
2023 मध्ये अधिकमास 18 जुलैपासून सुरू होईल तर 16 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल. या महिन्याला भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना म्हटलं जातं. हा महिना श्रावण महिन्यातच सुरू होणार असल्याने महादेवाची भक्ती करणाऱ्यांना अधिक वेळ मिळणार आहे.
2023 मुळे, अनेक उपवास आणि सणांच्या तारखांमध्ये बदल
-मकर संक्रांतीच्या आधी सकट चौथ: मकर संक्रांतीच्या नंतर दरवर्षी अंगारकी चतुर्थी येते. पण 2023 मध्ये अंगारकी चतुर्थी 10 जानेवारीला आणि मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला साजरा केला जाईल.
-चातुर्मास 5 महिन्यांचा असेल: 2023 मध्ये चातुर्मास 5 महिन्यांचा असेल. जे साधारणपणे चार महिन्यांचे असते. चातुर्मासात भगवान विष्णू संपूर्ण चार महिने योगनिद्रामध्ये असतात. परंतु या वर्षी भगवान विष्णू योगनिद्रामध्ये 5 महिने राहतील आणि या काळात गृह प्रवेश, मुंडन, विवाह, इत्यादी शुभ कार्ये होणार नाहीत.
8 श्रावणी सोमवार असतील
सहसा श्रावण महिन्यात 4 किंवा 5 सोमवार येतात. पण 2023 मध्ये 8 श्रावण सोमवार केले जाईल. कारण पंचांगानुसार, सावन कृष्णपक्ष 4 ते 17 जुलैपर्यंत आहे आणि त्यानंतर 18 जुलैपासून लागू होईल. तर, 16 ऑगस्ट रोजी मलमास अमावस्या असेल. या दिवशी अधिक मास समाप्त होईल. यानंतर, श्रावणचा शुक्ल पक्ष सुरू होईल, जो 30 ऑगस्ट रोजी, श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होईल. अशाप्रकारे श्रावण महिन्यातील अतिरिक्त मासामुळे 8 सोमवार येणार आहेत.
रक्षाबंधनाच्या तारखेतही बदल:
2023 मध्ये, श्रावण दोन महिन्यांचा म्हणजेच 60 दिवसांचा असल्यामुळे रक्षाबंधनाच्या तारखेतही बदल होईल. यावर्षी रक्षाबंधन ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. तर रक्षाबंधन साधारणपणे 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या