एक्स्प्लोर

Hartalika Teej 2024 : आज हरतालिकेचा दिवस...जाणून घ्या पूजेची योग्य वेळ, शुभ मुहूर्त, तिथी आणि साहित्याची A to Z यादी

Hartalika Teej 2024 Muhurat : हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी गणपती आणि शंकर-पार्वतीची पूजा करावी.

Hartalika Teej 2024 Muhurat : हिंदू पंचांगानुसार, आज हरतालिकेचा (Hartalika) व्रत आहे. देशातील अनेक भागांत हरतालिकेचे हे व्रत पाळले जाते. हरतालिकेतचं व्रत भगवान शंकर-माता पार्वतीला समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकर (Lord Shiva) आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात.

हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मूर्तीची विधिवत पूजा करतात आणि उपवास धरतात. यंदा हरतालिकेचा शुभ मुहूर्त नेमका कधी ते जाणून घेऊयात. 

हरतालिका पूजा विधी (Hartalika Puja Vidhi 2024)

हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. या दिवशी गणपती आणि शंकर-पार्वतीची पूजा करावी. शक्य असल्यास सत्यनारायण पूजेच्या वेळी बांधतो तसे केळीचे खांब बांधून चौरंग फुलांनी सजवावा. व्रतकर्त्या स्त्रीने रेशमी वस्त्र आणि विविध अलंकार घालून मग पूजेला सुरुवात करावी.

चौरंगावर रंगीत वस्त्र घाला, त्यावर कलश ठेवून बाजूला तांदूळ पसरवा. त्यावर पार्वतीची छोटी मातीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवा. गणपती बाप्पांचा फोटो ठेवून बाप्पाची पूजा देखील करावी, उपलब्ध फळं, फुलं अर्पण करावी. यावेळी शिव पार्वती मानून एका दांपत्याची देखील पूजा करावी. आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न, वस्त्र, दक्षिणा द्यावी. स्त्रियांना हळदकुंकू आणि वान दान करावे.

हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य 

तुम्ही जर हरतालिकेची पूजा करणार असाल तर त्यासाठी तुमच्याकडे काही वस्तूंची यादी असणं गरजेचं आहे. वाळू, बेलपत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरी फुलं, वस्त्र, सौभाग्याचं साहित्य, काजळ, कुंकू, चौरंग, रांगोळी, दूध, मध, पाण्याचा कलश, तूप, तेल, चंदन, शंख, घंटा, निरांजन, विड्याची पाने, तेलाच्या वाती, खडीसाखर,फळं, गूळ, खोबरं, समई, पंचामृत, उदबत्ती, अक्षता, कापूर, कोरे वस्त्र, पळी, पंचपात्र, हळद, कुंकू, ताम्हण तसेच फणी आणि आरसा यांसारखं साहित्य तुम्हाला लागणार आहे. 

'हा' असणार आहे हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त (Hartalika Puja Muhurta 2024)

पंचांगानुसार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:22 वाजता तृतीया तिथी सुरू होईल आणि 6 सप्टेंबर रोजी म्हणजेच (आज) पहाटे 03:01 वाजता समाप्त होईल. 6 सप्टेंबर रोजी उदय तिथी असल्याने या दिवशी उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 06.01 ते 08.32 पर्यंत असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Hartalika Teej 2024 : हरितालिकेच्या दिवशी 'या' 5 गोष्टींचे करा दान; महादेव-माता पार्वतीची सदैव राहील कृपा

महत्त्वाच्या बातम्या

Datta Jayanti 2026: दत्त जयंती येतेय..कधी आहे दत्त जयंती? गुरूचरित्र सप्ताह कधीपासून? शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा
दत्त जयंती येतेय..कधी आहे दत्त जयंती? गुरूचरित्र सप्ताह कधीपासून? शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा
Shani Dev: 2027 वर्ष येण्यापूर्वीच शनिचं 4 राशींना मोठं सरप्राईझ, शनिची मार्गी चाल प्रगतीचा मार्ग मोकळा करणार, नववर्षात पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल
2027 वर्ष येण्यापूर्वीच शनिचं 4 राशींना मोठं सरप्राईझ, शनिची मार्गी चाल प्रगतीचा मार्ग मोकळा करणार, नववर्षात पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल
Horoscope Today : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...डिसेंबरचा पहिलाच आठवडा नशीबाचा गेम पालटणारा! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...डिसेंबरचा पहिलाच आठवडा नशीबाचा गेम पालटणारा! 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Embed widget