Hartalika 2025: विवाह होत नाही? दांपत्यांमध्ये मतभेद? पतीची प्रगती? हरतालिकेचे 'असे' व्रत कराल, सौभाग्य कुठेही जाणार नाही..
Hartalika 2025: धार्मिक मान्यतेनुसार, हरतालिका तृतीयाच्या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्याकरिता आणि अविवाहित मुली इच्छित पतीसाठी हे व्रत करतात. जाणून घेऊया सर्व माहिती..

Hartalika 2025: हिंदू धर्मात हरतालिका तृतीया हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. विशेषत: महिलांसाठी हा सण अत्यंत खास आहे. जो प्रामुख्याने भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. काय आहे या दिवसाचं महत्त्व? महिला हे व्रत प्रामुख्याने का करतात? या दिवसाची तिथी, उपाय सर्व माहिती जाणून घेऊया..
“हरतालिका” असं नाव का पडलं?
- “हर” म्हणजे भगवान शंकर आणि “तालिका” म्हणजे मैत्रिणी.
- या दिवशी पार्वती देवीने आपल्या सखींसह (मैत्रिणींनी मदत करून) भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केलं.
- त्यामुळे या व्रताला “हरतालिका” असं नाव पडलं.
- या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्याकरिता आणि अविवाहित मुली इच्छित पतीसाठी हे व्रत करतात.
हरतालिका तृतीया 2025 कधी आहे?
- 26 ऑगस्ट 2025 मंगळवार
- (भाद्रपद शुक्ल तृतीया)
या दिवशी करावयाचे उपाय
उपवास व्रत
- उपवास करून फक्त फळाहार, पाणी किंवा निर्जळ उपवास करावा.
- संध्याकाळी भगवान शंकर-पार्वतीची प्रतिमा / मातीची मूर्ती ठेवून पूजन करावे.
शिव-पार्वती पूजन
आरती
- पार्वती मातेचे सौंदर्यद्रव्यांनी (कुंकू, बांगड्या, हळद, फुले) अलंकरण करावे.
- शंकराला बेलपत्र, धोतरी, पांढरे फुल, गंगाजल अर्पण करावे.
आणि कथा श्रवण
- हरतालिका व्रत कथा श्रवण करणे अनिवार्य आहे.
- शिव-पार्वती आरती करावी.
विशेष उपाय
- विवाहासाठी अडथळे असलेल्या मुलींनी या दिवशी पार्वतीला हिरवी साडी, ओढणी अर्पण करावी.
- दांपत्यांमध्ये मतभेद असल्यास शिव-पार्वतीची संयुक्त आरती करून दोघांनी प्रार्थना करावी – यातून सौहार्द वाढतो.
- पतीच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी स्त्रियांनी बेलपत्रावर लाल हळद लिहून “ॐ नमः शिवाय” मंत्र जप करत अर्पण करावे.
दान पुण्य
स्त्रियांनी या दिवशी सौभाग्याच्या वस्तू (कुंकू, हिरवा चुडा, बांगड्या, पैंजण) इतर स्त्रियांना दान कराव्या.
यामुळे सौभाग्य चिरस्थायी राहते.
महत्व
- हरतालिका व्रत केल्याने अविवाहित मुलींना इच्छित पती मिळतो.
- विवाहित महिलांसाठी हे व्रत पतीच्या दीर्घायुष्य, वैवाहिक आनंद आणि समृद्धी प्रदान करणारं मानलं जातं.
- शिव-पार्वतीच्या कृपेने घरातील मतभेद, आर्थिक अडचणी आणि आरोग्याचे प्रश्न कमी होतात.
डॉ भूषण ज्योतिर्विद
हेही वाचा :
Weekly Horoscope 25 To 31 August 2025: ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात 'या' 5 राशींचे नशीब सुस्साट! संपूर्ण आठवडा कसा जाणार? मेष ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















