एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Hanuman Jayanti 2024 : जगातील सर्वात उंच 105 फुटांची हनुमंत मूर्ती पाहिली? बुलढाण्यातील या मूर्तीला हनुमान जयंतीनिमित्त महाजलाभिषेक, पाहा फोटो

Hanuman Jayanti 2024 : यंदा बुलढाण्यात विविध कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी होणार आहे. बुलढाण्यातील नांदुरा येथे 105 फूट उंच विशालकाय बजरंग बलीची मूर्ती आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त जगातील सर्वात उंच आणि महाकाय हनुमंताला महाजलाभिषेक होणार आहे.

Buldhana : असं म्हटलं जातं की प्रत्येक गावात काही वैशिष्ट्य असलं की त्या गावाला त्याची ओळख मिळते... काहीसं असच बुलढाण्यातील नांदुरा या गावाबाबत घडलं आहे... नांदुरा गाव तसं छोटं... पण मध्य रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 येथून जाण्यापालीकडे या गावाची ओळख नव्हती....पण आता नांदुरा या गावाला 2001 पासून नवीन ओळख मिळाली आहे....आणि ती म्हणजे "हनुमान नगरी" म्हणून... ती म्हणजे या गावाजवळ असलेली जगातील सर्वात उंच आणि विशालकाय अशी 105 फूट उंच हनुमानाची मूर्ती....!

मूर्ती स्थापन्याचा रोचक इतिहास

जवळपास पंचवीस वर्षाआधी नांदुरा येथील एक कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा नागपूर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन गेला असताना त्याठिकाणी एका आंध्रप्रदेशातील व्यापाराला या शेतकऱ्याचा कांद्याचा दर्जा आवडला आणि त्याने या शेतकऱ्याला कांदा कुठला अशी विचारपूस केली असता त्याने नांदुरा अस सांगितलं. आंध्रप्रदेशातील या शिवराम मोहनराव या व्यापाऱ्याने नंतर नांदुरा येथे भेट देऊन याठिकाणी व्यापारानिमित्त स्थायिक होण्याचं ठरवलं. मोहनराव हे बालाजींचे भक्त असल्याने त्यांनी याठिकाणी 1999 साली बालाजी ट्रस्ट स्थापन केलं.

हनुमान हे बालाजीचे भक्त असल्याने त्यांनी नांदुरा येथे हनुमानाची भव्य आणि विशालकाय मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय 2000 साली घेतला. त्याकाळी अशी मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास 50 ते 60 लाख रुपये खर्च येणार होता, त्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशातुन मूर्तिकार आणून ही मूर्ती घडवली. या मूर्तीच्या बाजूलाच बालाजीचे भव्य आणि आकर्षक असं मंदिरही बांधण्यात आलं आहे.

105 फूट उंच मूर्तीची वैशिष्ट्ये

आंध्रप्रदेशातील पेद्दापुरम येथील जॉन बाबू या मुर्तीकाराने ही मूर्ती तब्बल 210 दिवस अथक प्रयत्नातून साकारली आहे. ही 105 फूट उंच हनुमंताची मूर्ती अतिशय सुंदर आणि सुबक आहे. मूर्तीच्या कपाळावर सुवर्ण लेपन केलेलं टिळक लावलेलं आहे. मूर्तीमध्ये 1 इंच ते 12 इंच साईझचे जवळपास एक हजार कृत्रिम डायमंड लावलेले आहेत. मूर्तीचे डोळे 27 इंच बाय 24 इंच या आकाराचे असून मानवाचे कृत्रिम डोळे बनवणाऱ्या कंपनीत ते बनवले गेले आहेत.

मूर्तीला दररोज जलाभिषेक करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच मूर्तीला साडे तीन क्विंटलचा हार रिमोटद्वारे चढवण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे, हनुमान हे बालाजींचे भक्त असल्याने शेजारीच कोट्यवधी रुपये खर्च करून बालाजी मंदिर बनविण्यात आलंय. सुंदर असं हे मंदिर आहे...तर या ठिकाणी एक नेत्र रुग्णालय सुद्धा चालवण्यात येत आहे.

जागतिक पातळीवर मूर्तीची नोंद

एकंदरीत जगातील या उंच व विशालकाय अशा हनुमंताच्या 105 फूट उंच मूर्तीची "गिनीज बुक ऑफ लिम्का "ने सुद्धा 2003 साली दखल घेतली आहे. दररोज याठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. वर्षभर या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. आज हनुमान जन्मोत्सव असल्याने लाखो भक्त याठिकाणी सकाळ पासूनच पूजा अर्चा करण्यासाठी आले आहेत. या वर्षी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा हनुमान जन्मोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.

हेही वाचा:

Lord Hanuman Baby Names : रीतम ते रुद्रांक्ष... हनुमान जयंतीला जन्मलेल्या बाळांची ठेवा 'ही' युनिक नावं, मूल होईल हनुमानासारखं बलवान, अर्थासह नावं जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde on Bihar Result : बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारुन विकास राज स्वीकारलं
Delhi BJP Celebration : NDA ला बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, दिल्लीत जोरदार सेलिब्रेशन
PM Modi Full Speech Bihar Result : युवकांनी बिहारमधील जंगलराज संपवलं, विजयानंतरचं मोदींचं पहिलं भाषण
J. P. Nadda Delhi Speech मोदींची हॅट्रीक,बिहारच्या विजयानंतर जे. पी नड्डा यांचं भाजप मुख्यालयात भाषण
PM Modi On Bihar Result : NDA च्या विजयाने MY म्हणजे महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनला - मोदी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी
एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी
MIM Bihar MLA List : गेल्यावेळी आमदारांनी अर्ध्यात साथ सोडली, ओवेसींनी बिहारमध्ये पुन्हा ताकद लावली, एमआयएमचे नव्या विधानसभेत किती आमदार?
गेल्यावेळी आमदारांनी अर्ध्यात साथ सोडली, ओवेसींनी बिहारमध्ये पुन्हा ताकद लावली, एमआयएमचे नव्या विधानसभेत किती आमदार?
Vaibhav Suryavanshi : रायझिंग स्टार टी 20 चषकात वैभव सूर्यवंशीचं वादळ, अवघ्या 42 चेंडूत 144 धावा, 11 चौकार आणि 15 षटकारांचा पाऊस
Vaibhav Suryavanshi : रायझिंग स्टार टी 20 चषकात वैभव सूर्यवंशीचं वादळ, अवघ्या 42 चेंडूत 144 धावा, 11 चौकार आणि 15 षटकारांचा पाऊस
Embed widget