Guru Purnima 2025: आजची गुरुपौर्णिमा अद्भूत! तुमच्या राशीनुसार गुरूंना 'या' गोष्टींची भेट द्या, पुण्य पदरी पडेल, संपत्तीत होईल मोठी वाढ
Guru Purnima 2025: आजची गुरुपौर्णिमा अत्यंत खास आहे. कारण तुमच्या राशीनुसार काय दान कराल ते जाणून घेऊया. जेणेकरून जीवनात सदैव आनंद राहील.

Guru Purnima 2025: हिंदू धर्मात, गुरुचे स्थान देवापेक्षाही उच्च असल्याचे म्हटले जाते. आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुचे महत्त्वाचे स्थान आहे. असे मानले जाते की गुरुशिवाय ज्ञान अपूर्ण राहते. म्हणूनच आपण सर्वजण गुरुंचा आदर करतो. गुरु पौर्णिमा हा गुरूंप्रती भक्ती आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी गुरूंची पूजा केल्याने कुंडलीतील गुरूच्या अशुभ परिणामांपासून मुक्तता मिळते. भारतासह विविध देशांमध्ये गुरूपौर्णिमा हा सण मोठ्या भक्तीने साजरा केला जातो. सर्व धर्मातील लोकांनी त्यांच्या गुरुंचा सन्मान करण्यासाठी वर्षातून एक विशेष दिवस निश्चित केला आहे. ज्या दिवशी ते त्यांच्या गुरुकडून आशीर्वाद घेतात. सनातन धर्मातील लोकांनी त्यांच्या गुरुंचा आदर करण्यासाठी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेची तारीख निश्चित केली आहे.
आजची गुरुपौर्णिमा अद्भूत! तुमच्या राशीनुसार 'या' गोष्टी दान करा..
वैदिक पंचांगानुसार, 2025 वर्षी गुरुपौर्णिमा आज म्हणजेच 10 जुलै रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी पूजा, जप, तप आणि दान केल्याने अचुक परिणाम मिळतात. अशा वेळी, तुमच्या राशीनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या गुरुंना काय भेट द्याल ते जाणून घेऊया. जेणेकरून आपल्या जीवनात आनंद राहील.
मेष - या राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या गुरुंना लाल वस्त्र आणि मिठाई दान करावी. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील.
वृषभ - या राशीच्या लोकांनी गुरु पौर्णिमेला त्यांच्या गुरुंना पांढरे कपडे, लोणी, साखर आणि पांढरी मिठाई दान करावी.
मिथुन - या राशीच्या लोकांनी गुरु पौर्णिमेला त्यांच्या गुरुंना हिरवे कपडे आणि हिरवे चणे दान करावे. असे केल्याने त्यांना गुरुंचा आशीर्वाद मिळेल.
कर्क - या राशीच्या लोकांनी गुरु पौर्णिमेला त्यांच्या गुरुंना पांढऱ्या वस्तू दान कराव्यात. तसेच गरीब आणि गरजूंना धान्य दान करावे.
सिंह - या राशीच्या लोकांनी गुरु पौर्णिमेला त्यांच्या गुरुंना पितांबर आणि बुंदी लाडू दान करावे. असे केल्याने त्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल.
कन्या - या राशीच्या लोकांनी गुरु पौर्णिमेला गुरुंना गोड पदार्थ खाऊ घालावा आणि त्यांच्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी. तसेच हिरव्या भाज्या आणि हिरवी फळे दान करावीत.
तूळ - या राशीच्या लोकांनी गुरु पौर्णिमेला त्यांच्या गुरुंना पांढरे कपडे आणि तांदूळ दान करावेत. तसेच, खीर बनवून गरीब आणि गरजूंना खाऊ घालावा.
वृश्चिक - या राशीच्या लोकांनी त्यांच्या गुरूंना लाल फुलांची माळ घालून त्यांचा आदर करावा. तसेच पिवळे कपडे, बेसन, हरभरा डाळ दान करावी.
धनु - या राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या गुरूंना पिवळे कपडे, बेसन, हरभरा डाळ दान करावी. असे केल्याने शुभ फळे मिळतील.
मकर - मकर राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या गुरूंना वस्त्र, काळे तीळ, छत्री, चप्पल किंवा बूट दान करावेत.
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या गुरूंना कपडे, उडीद डाळ आणि छत्री दान करावी.
मीन - मीन राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या गुरूंना पिवळ्या रंगाची मिठाई आणि पिवळ्या रंगाचे कपडे, बेसन डाळ इत्यादी दान करावेत.
हेही वाचा :
Guru Purnima 2025: आज सोन्याचा दिवस आलाच! गुरुपौर्णिमेला दत्तगुरू कृपेने होतील पूर्ण इच्छा, ग्रहांचा जबरदस्त संयोग, भाग्यवान राशी, पूजेची योग्य वेळ, धार्मिक महत्त्व वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















