(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Goddess Lakshmi: धन-वैभव तुमच्याकडे चालून येतंय..! फक्त त्यापूर्वी ओळखा 'हे' संकेत! घरात लक्ष्मीचा वास कसा ओळखाल?
Goddess Lakshmi: जर तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होणार आहेत. जर तुमच्या घरात संपत्ती येणार असेल तर तुम्हाला असे काही संकेत मिळू लागतात.
Goddess Lakshmi: धन-वैभव, संपत्ती कोणाला नको असते? आजच्या या कलियुगात श्रीमंत आणखीनच श्रीमंत होत चाललाय, आणि गरिब गरिबच राहतोय. पण ते म्हणतात ना, जर तुमच्या नशिबात धन-वैभवचा योग असेल, तर तो तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. काही लोक देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव रहावा यासाठी विविध उपाय करतात, पूजा करतात, हवन करतात. तुम्हाला माहिती आहे का? की जेव्हा तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होणार असते, त्यापूर्वीच तुम्हाला काही संकेत मिळू लागतात. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होण्यापूर्वी तुमच्या जीवनात आणि घरात असे काही बदल दिसून येतात. जे तुम्ही सहज ओळखू शकता.
घुबडाचे दर्शन
जर तुमच्या जीवनात धन-समृद्धी येणार असेल तर त्याआधी तुम्हाला लक्ष्मीचे वाहन घुबडाचे दर्शन होऊ शकते. हा एक असा पक्षी आहे जो सहजासहजी दिसत नाही. हिंदू धर्मग्रंथांमध्ये घुबड पाहणे खूप शुभ मानले जाते. सूर्यास्ताच्या वेळी जर एखाद्याला घुबड दिसले तर समजून घ्या की, देवी लक्ष्मी आता तुमच्या घरात कायमचा वास करणार आहे.
काळ्या मुंग्या
जर तुम्हाला तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसू लागल्या तर हे देखील देवी लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. असे मानले जाते की देवी लक्ष्मीने तुमच्या घरात प्रवेश केला आहे. त्यामुळे या काळात तुमच्या घराची ऊर्जा सकारात्मक ठेवा.
झाडू
झाडूला देवी लक्ष्मीचेही प्रतीक मानले जाते. धार्मिक मान्यतांनुसार, जर तुम्हाला घरातून बाहेर पडताच कोणी झाडू मारताना दिसले तर त्या दिवशी तुमचे सर्व काम पूर्ण होतील आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील असा विश्वास ठेवा.
शंख
लक्ष्मीचा भाऊ म्हणून शंखाची पूजा केली जाते. सकाळी उठल्याबरोबर अचानक शंखाचा आवाज आला तर हे देखील लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक आहे. त्या दिवशी तुम्हाला अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो.
जीवनात प्रगतीच्या मार्गावर पुढे जावे
तसं पाहायला गेलं तर जीवनात चांगले किंवा वाईट काळ येतच राहतात, जीवनात आपल्याला प्रत्येक परिस्थितीत चांगले करण्याच्या अनेक संधी मिळतात. जे लोक या संधींचा वेळीच फायदा घेतात, त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. हिंदू धर्मग्रंथानुसार देवी लक्ष्मी चंचल स्वभावाची आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावेत अशी तुमची इच्छा असेल, तर हे संकेत पाहून तुम्ही जीवनात प्रगतीच्या मार्गावर पुढे जावे.
हेही वाचा>>>
Shivling: एक अद्भूत शिवलिंग! जिथे हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक होतात नतमस्तक, काय कारण आहे?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )