Shivling: एक अद्भूत शिवलिंग! जिथे हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक होतात नतमस्तक? काय कारण आहे?
Religion: भारतामध्ये असे एक मंदिर आहे जेथे केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिमही शिवलिंगाची पूजा करतात. काय कारण आहे?
Shivling: हिंदू धर्मात भगवान शिव हे विश्वाचे संहारक असल्याचा उल्लेख आहे. भगवान शिव हे महादेव... भोलेनाथ... आदिनाथ अशा अनेक नावांनी ओळखले जातात. धार्मिक मान्यतेनुसार कैलास पर्वतावर वास्तव्य करणारे शिव हे देवांचे देव मानले जातात. भगवान शंकराच्या चमत्कारांच्या कथा असंख्य आहेत. आज आपण भारतातील भगवान शिवाच्या अशा एका मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे केवळ हिंदू धर्माचे लोकच नाही तर मुस्लिम देखील त्याच श्रद्धेने दर्शनासाठी येतात. दोन्ही धर्माचे लोक सकाळ संध्याकाळ एकत्र शिवलिंगाची पूजा करतात. असं काय कारण असावं जिथे दोन्ही धर्माचे लोक नतमस्तक होतात.
मुस्लिम धर्मीय या शिवलिंगाची पूजा करतात?
इस्लाम धर्मानुसार तौहीद म्हणजे अल्लाह हा एकमेव देव आहे आणि त्याच्याशिवाय इतर कोणाची पूजा करणे हे शिर्क म्हणजेच मूर्तिपूजा आहे, जे इस्लाममध्ये सर्वात मोठे पाप मानले जाते. जर असे असेल तर मग हे इस्लाम धर्माचे लोक मंदिरात पूजा करण्यासाठी का जातात? शिवलिंगाला जल का अर्पण करतात? या मागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया...उत्तर प्रदेशातील गोरखपूरपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरात केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिमही शिवलिंगाची पूजा करतात.
शिवलिंगावर उर्दू भाषेत कोरला कलमा?
या रहस्यमय शिवलिंगावर उर्दू भाषेत काहीतरी कोरण्यात आले आहे. ज्याला तेथील मुस्लिम अतिशय पवित्र मानतात. किंबहुना, मोहम्मद गझनवी भारतात आल्यावर जिथे जिथे त्याला हिंदू मंदिर दिसले, त्यांनी लगेच आपल्या सैन्याला ते पाडण्याचा आदेश दिला. जेव्हा त्यांचे लक्ष या मंदिरावर पडले तेव्हा त्यांनी आपल्या सैन्याला ते पाडण्यास सांगितले. पण, हे शिवलिंग कोणीही तोडू शकले नाही. अखेर सर्वांनीच पराभव स्वीकारला.
या शिवलिंगावर शस्त्रांचा मारा केला पण...
मोहम्मद गझनवीच्या सैन्याने शिवलिंग जितके खोल खोदले तितके शिवलिंग वाढत गेले. गझनवीनेही या शिवलिंगावर शस्त्रांचा मारा केला पण हे शिवलिंग जसेच्या तसे उभे राहिले. जेव्हा त्याने पूर्णपणे पराभव स्वीकारला तेव्हा त्याने शिवलिंगावर कलमा कोरला, जेणेकरून हिंदूंनी या शिवलिंगाची पूजा करू नये. पण या शिवलिंगावर कलमा कोरल्यानंतर तो आणखी प्रसिद्ध होईल हे त्याला फारसे माहीत नव्हते. पुढे हिंदूंसोबत मुस्लिमांनीही शिवलिंगाची पूजा करण्यास सुरुवात केली. भारतात महादेवाची अनेक चमत्कारिक मंदिरे आहेत. या मंदिरांचा इतिहासही खूप रंजक आहे.
हेही वाचा>>>
Maharashtra Hidden Places: 'अरेच्चा..! महाराष्ट्रात लपलेले 'हे' सुंदर हिल स्टेशन माहितच नव्हते!' अनेकांच्या नजरेपासून दूर, एकदा बघाल तर प्रेमातच पडाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )