Gemini Weekly Horoscope 29 April to 5 May : नवीन आठवडा मिथुन राशीसाठी खर्चाचा; नोकरी-व्यवसायात मिळणार प्रगतीच्या संधी? जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य
Gemini Weekly Horoscope 29 April to 5 May : मिथुन राशीसाठी नवा आठवडा कसा असेल? या आठवड्यात करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Gemini Weekly Horoscope 29 April to 5 May : राशीभविष्यानुसार, मिथुन राशीचा हा आठवडा चढ-उतारांचा असणार आहे. लव्ह लाईफमधील समस्या सोडवण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर तूर्तास तो टाळावा. या आठवड्यात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. तुमचं आरोग्य चांगलं राहील. एकूणच मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मिथुन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Love Horoscope)
या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव कराल. प्रियकरासोबत रोमँटिक ठिकाणी फिरायला जाल. लव्ह लाईफसाठी हा काळ चांगला असेल. जोडीदाराच्या शोधात असलेल्या अविवाहितांनी लग्नाची घाई करू नये आणि अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीचा विचार करावा.
मिथुन राशीचे करिअर (Gemini Career Horoscope)
या आठवड्यात कामाच्या ठिकाणी हुशारीने काम करा. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा, कोणत्याही वादात पडू नका. सहकाऱ्यांसोबत चांगल्या पद्धतीने वागा, यामुळे तुम्हाला सर्व कामांमध्ये त्यांची मदत मिळेल. मिथुन राशीचे काही लोक या आठवड्यात नोकरी बदलू शकतात. काही लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. आज विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.
मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini Wealth Horoscope)
नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील. तुम्ही तुमचं एकूण उत्पन्न आणि खर्च यात संतुलन ठेवलं पाहिजे. उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणुकीचे निर्णय अत्यंत हुशारीने घ्या. काही लोक या आठवड्यात शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात वडिलांकडून पैसे मिळू शकतात.
मिथुन राशीचे आरोग्य (Gemini Health Horoscope)
या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तुमच्या दैनंदिन जीवनात काही शारीरिक हालचालींचा समावेश करा. फिरायला जा, व्यायामशाळेत जा किंवा घरीच व्यायाम करुन पहा. सकस आहार घ्या आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या. स्वतः ची काळजी घेण्यात स्वत:ला व्यस्त करा, ध्यान देखील करा. आपल्या मानसिक आरोग्यासह शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :