एक्स्प्लोर

Aries Weekly Horoscope 17 To 23 March 2024 : नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी चढ-उतारांचा; पैशांच्या व्यवहारात थोडं जपून, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Aries Weekly Horoscope 17th To 23rd March 2024 : मेष राशीचा हा आठवडा तसा चांगलाच असणार आहे. तुम्हाला नोकरी-व्यवसायातून विशेष लाभ मिळेल, तुमची लव्ह लाईफ देखील चांगली असणार आहे. परंतु आर्थिक व्यवहार तुम्हाला जबाबदारीने हाताळावे लागतील.

Aries Weekly Horoscope 17 To 23 March 2024 : राशीभविष्यानुसार, हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. मेष राशीसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरेल. या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असेल, परंतु त्याच वेळी आर्थिक व्यवहारात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. एकूणच मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मेष राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Love Horoscope)

तुमची लव्ह लाईफ अजून बहरण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे. या आठवड्यात जोडीदारासोबत तुमचे किरकोळ वाद होऊ शकतात, परंतु आठवड्याच्या अखेरीस सर्व वाद सोडवावे लागतील. जास्त वाद झाल्यास तुम्ही थोडं शांतीत घ्या. तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि तुमचं नातं अधिक घट्ट करा. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला तुमच्या घरातल्यांशी भेटवायचं असेल आणि लग्नाबद्दल बोलायचं असेल तर हा आठवडा चांगला आहे. काही लोकांच्या प्रेमाचं रुपांतर प्रेमविवाहात होईल.

मेष राशीचे करिअर (Aries Career  Horoscope)

या आठवड्यात नोकरी-व्यवसायात तुम्हाला सावध राहावं लागेल. व्यावसायिकांना ग्राहकांशी नीट वागावं लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकतं. व्यावसायिकांना या आठवड्यात काही नवीन कल्पना सुचू शकतात. नोकरदारांनी कार्यालयीन राजकारणात अडकू नये. हा वेळ तुमच्यासाठी चांगला आहे, त्यामुळे प्रगतीच्या संधी शोधा. कामातील तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन करावं लागेल. तुमच्या आऊट-ऑफ-द-बॉक्स कल्पना तुम्हाला यश मिळवण्यात मदत करतील, तुमचे वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील. या आठवड्यात जे लोक इंटरव्ह्यूला जाणार आहेत, त्यांना नवीन नोकरी खात्रीने मिळेल.

मेष राशीची आर्थिक स्थिती (Aries Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. या आठवड्यात तुम्हाला अनेक ठिकाणांहून पैसे मिळतील. रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी आठवड्याचे दोन-तीन दिवस चांगले असणार आहेत. व्यावसायिकांना गुंतवणुकीसाठी चांगले स्रोत मिळतील, पण सर्व अभ्यास करुनच गुंतवणूक करा. महिलांना काही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल. या आठवड्यात तुमच्याकडून काही व्यवहार चुकू शकतात, त्यामुळे पैशाचे व्यवहार जपून हाताळा. 

मेष राशीचे आरोग्य  (Aries Health Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला किरकोळ आरोग्याच्या समस्या जाणवतील. तुम्हाला पोटदुखी किंवा अपचनासारख्या समस्या जाणवू शकतात. गरोदर महिलांनी त्यांच्या बेबी बंपची काळजी घ्यावी, अन्यथा गर्भधारणेशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Saptahik Rashi Bhavishya 17 To 23 March 2024: कसा जाईल आर्थिक वर्षातील शेवटचा महिना? वृषभ, कर्क,कुंभ, मीनसाठी ठरणार लाभदायक तर या राशींना बसणार आर्थिक फटका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget