Ganesh Chaturthi 2025: श्रीगणेशाचे 'हे' शुभ रंग माहितीयत? गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत तुमच्या राशीनुसार वापराल तर, भाग्य चमकलंच म्हणून समजा..
Ganesh Chaturthi 2025: ज्योतिषीय दृष्टीकोनातून 12 राशीनुसार गणपतीचे 10 शुभ रंग येथे सांगण्यात आले आहेत, तसेच उपाय एकत्रित दिले आहेत, जे पूजा, सजावट, नैवेद्य किंवा वस्त्रांसाठी उपयोगी पडतील.

Ganesh Chaturthi 2025: हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे स्वतःचे एक विशेष महत्त्व असते. त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी हा सण विघ्नांचा नाश करणाऱ्या भगवान गणेशाला समर्पित आहे, गणेशोत्सव हा एकूण 10 दिवस साजरा केला जातो. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश उत्सवाने सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपते. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर यंदाचा गणेशोत्सव अत्यंत खास आहे, या काळात अनेक ग्रहांचे संक्रमण होतंय. डॉ भूषण ज्योतिर्विद यांनी ज्योतिषीय दृष्टीकोनातून प्रत्येक राशीनुसार गणपतीचे 10 शुभ रंग येथे सांगितले आहेत, तसेच 10 दिवसांसाठी उपाय एकत्रित दिले आहेत, जे पूजा, सजावट, नैवेद्य किंवा वस्त्रांसाठी उपयोगी पडतील.
मेष (Aries)
शुभ रंग: लाल, केशरी
उपाय: लाल/केशरी फुलं अर्पण करा, मोदकाचा नैवेद्य द्या.
मंत्र: “ॐ गं गणपतये नमः” 108 वेळा जपा.
फळ: करिअर आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात.
वृषभ (Taurus)
शुभ रंग: पांढरा, हिरवा
उपाय: पांढरे मोदक किंवा दुधाचा नैवेद्य द्या.
मंत्र: “ॐ श्रीं गणेशाय नमः” 11 माळा जपा.
फळ: आर्थिक स्थैर्य व कौटुंबिक सुख मिळते.
मिथुन (Gemini)
शुभ रंग: हिरवा, पिवळा
उपाय: हिरव्या दुर्वांचा हार रोज अर्पण करा.
मंत्र: “ॐ वक्रतुण्डाय हुं” 5 माळा जपा.
फळ: अभ्यास व बुद्धीच्या कार्यात यश मिळते.
कर्क (Cancer)
शुभ रंग: पांढरा, चांदणी रंग
उपाय: पांढरी फुलं व नारळाचा नैवेद्य द्या.
मंत्र: “ॐ गजवदनाय नमः” 108 वेळा जपा.
फळ: घरातील शांती, कौटुंबिक समाधान वाढते.
सिंह (Leo)
शुभ रंग: लाल, सुवर्ण
उपाय: सुवर्ण/पिवळी फुलं अर्पण करा.
मंत्र: “ॐ एकदन्ताय नमः” 108 वेळा जपा.
फळ: कीर्ती, आत्मविश्वास व यश प्राप्त होते.
कन्या (Virgo)
शुभ रंग: हिरवा, पिवळसर हिरवा
उपाय: हिरव्या मूगाची खिचडी नैवेद्य म्हणून द्या.
मंत्र: “ॐ हेरंबाय नमः” 5 माळा जपा.
फळ: आरोग्य सुधारते आणि कार्यक्षमता वाढते.
तूळ (Libra)
शुभ रंग: गुलाबी, पांढरा
उपाय: गुलाबी किंवा पांढरी फुलं रोज अर्पण करा.
मंत्र: “ॐ लम्बोदराय नमः” 108 वेळा जपा.
फळ: नाती सौहार्दपूर्ण होतात व आर्थिक प्रगती होते.
वृश्चिक (Scorpio)
शुभ रंग: लाल, मॅरून
उपाय: लाल फुलं आणि गूळ-नारळ नैवेद्य द्या.
मंत्र: “ॐ विघ्ननाशनाय नमः” 11 माळा जपा.
फळ: शत्रूंवर विजय व अडथळ्यांचे निराकरण होते.
धनु (Sagittarius)
शुभ रंग: पिवळा, केशरी
उपाय: पिवळ्या चण्याच्या डाळीचा नैवेद्य द्या.
मंत्र: “ॐ गणाधिपतये नमः” 108 वेळा जपा.
फळ: भाग्यवृद्धी व आध्यात्मिक प्रगती होते.
मकर (Capricorn)
शुभ रंग: निळा, काळा
उपाय: निळ्या फुलांचा हार व तिळाच्या लाडूंचा नैवेद्य.
मंत्र: “ॐ धूम्रकेतवे नमः” 5 माळा जपा.
फळ: परिश्रमाचे फळ व स्थैर्य मिळते.
कुंभ (Aquarius)
शुभ रंग: निळा, जांभळा
उपाय: जांभळ्या किंवा निळ्या फुलांनी गणपती सजवा.
मंत्र: “ॐ गणेश्वराय नमः” 108 वेळा जपा.
फळ: नवीन संधी मिळतात व बुद्धी तेज होते.
मीन (Pisces)
शुभ रंग: पिवळा, गुलाबी
उपाय: बेसनाचे लाडू नैवेद्य द्या.
मंत्र: “ॐ वक्रतुण्डाय नमः” 11 माळा जपा.
फळ: मानसिक शांती, आध्यात्मिक उन्नती मिळते.
डॉ भूषण ज्योतिर्विद
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















