Feng Shui Tips : चुकूनही 'हे' तीन शो पीस घरात ठेवू नका, होईल नुकसान
Feng Shui Tips : . घर सजवण्यासाठी अनेक वेळा आपण नकळत अशा काही वस्तू खरेदी करतो, ज्याचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. वास्तुनुसार या तीन गोष्टी घरात ठेवल्याने अशुभ वाढते.
Feng Shui Tips : आपले घर आपल्या विचारांचा आरसा असते. येथेच आपल्याला दिवसभराच्या थकव्यापासून आराम मिळतो आणि शांत झोप मिळते. घरात शांती राहिल्यास त्याच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता नसावी, यासाठी आपण अनेक प्रकारच्या वस्तूंनी घर सजवतो. घर सजवण्यासाठी अनेक वेळा आपण नकळत अशा काही वस्तू खरेदी करतो, ज्याचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. वास्तुनुसार या तीन गोष्टी घरात ठेवल्याने अशुभ वाढते.
बोन्साय आणि काटेरी झाडे
घरात कधीही काटेरी झाडे लावू नयेत. असे केल्याने घरातील वास्तू बिघडते आणि नकारात्मकताही पसरते. घरातील सदस्यांचे अशुभ राहते. याशिवाय ज्या झाडांच्या पानातून दूध निघते, त्यांनाही घरात ठेवू नये. गुलाब, निवडुंग, किंवा इतर आकर्षक दिसणारी काटेरी झाडे ठेवणे टाळा.
नटराजाची मूर्ती
नटराजाची मूर्ती ही भगवान शिवाच्या तांडव नृत्यातील नृत्यप्रकार असल्याचे म्हटले जाते. परंतु हे नृत्य विनाशाचे प्रतीक आहे. त्यामुळे घरात शोपीस म्हणून कधीही ठेवू नये. ते ठेवल्याने घरात नेहमी अशांतता राहते.
हिंसक फोटो
सर्व सुंदर पेंटिंग घराच्या सजावटीसाठी चांगले नाहीत. त्यामुळे घरामध्ये कोणतेही पेंटिंग आणण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की सिंह, वाघ, चिता या हिंसक प्राण्याची, कोणतीही दुःखद घटना किंवा कोणाचे दुःख दर्शवणारी चित्रे लावू नका. त्यामुळे घरात नेहमी निराशेचे वातावरण असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
- Numerology : 'या' तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने श्रीमंत आणि अहंकारी असतात
- Samudra Shastra : ओठ सांगतात एखाद्या व्यक्तीचे नशीब आणि स्वभाव, कसे ते जाणून घ्या
- Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे...