Diwali 2023 : आज शोभन योग आणि अनुराधा नक्षत्राचा शुभ संयोग; 'या' 4 राशींना ठरणार लाभदायक
Diwali 2023 : दिवाळीचा चौथा दिवस गोवर्धन पूजा, पाडवा म्हणून साजरा केला जात आहे. या दिवशी शोभन योगसह अनेक शुभ योग घडून येत आहेत, त्यामुळे आजचा दिवस अनेक राशींसाठी लाभदायक असणार आहे.
Diwali 2023 : आज 14 नोव्हेंबरला चंद्राचं वृश्चिक राशीत भ्रमण होणार आहे. याशिवाय आज कार्तिक महिन्यातील (Kartik Month) कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी असून या दिवशी गोवर्धन पूजेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी घराच्या अंगणात शेण टाकून गोवर्धन साजरा केला जातो आणि संपूर्ण कुटुंबासह पूजा केली जाते. या दिवशी शोभन योग आणि अनुराधा नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने आजचा दिवस अत्यंत पवित्र मानला जात आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गोवर्धन पूजेच्या दिवशी तयार होणाऱ्या या शुभ योगांचा लाभ चार राशींना मिळेल.
मिथुन रास (Gemini)
अनुराधा नक्षत्रामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. मिथुन राशीच्या लोकांवर हनुमानाचा विशेष आशीर्वाद असणार आहे, ज्यामुळे त्यांची सर्व कामं हळूहळू पूर्ण होतील आणि तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. तुमच्याकडे जुनं कर्ज असेल तर तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता आणि आर्थिक समृद्धीची शुभ शक्यता आहे. कौटुंबिक व्यवसाय चालवणारे आज काही विशेष निर्णय घेऊ शकतात, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. लव्ह लाईफमध्ये असलेल्यांना कुटुंबाकडून तुमच्या नात्यासाठी हिरवा सिग्नल मिळू शकेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि गोवर्धन पूजेमुळे धार्मिक वातावरणही राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याचं लग्न ठरू शकतं आणि विशेष पाहुणे देखील घरी येऊ शकतात.
कर्क रास (Cancer)
ज्येष्ठ नक्षत्रामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. नोकरदार लोकांना काही संधी मिळतील, ज्यामुळे तुमची कामातील आवड वाढण्यास मदत होईल. व्यापारी आज व्यवसायात नवीन संपर्क प्रस्थापित करतील, जे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी एक आदर्श ठरतील. व्यवसाय करणाऱ्यांच्या बाजूने आज नशीब असेल, ज्यामुळे ते योग्य निर्णय घेतील आणि सन्मानाने संपत्ती वाढवू शकतील. मित्रांसोबत तुमचे संबंध दृढ होतील आणि तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याची योजना देखील बनवू शकता. तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मदतीने तुम्ही अनेक घरगुती कामं पूर्ण कराल. वडिलांसोबत सुरू असलेले वाद मिटतील आणि आरोग्यही चांगलं राहील.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शोभन योगामुळे सकारात्मक असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील आणि मालमत्तेद्वारे नफाही मिळू शकेल. आज उद्योगपतींना परदेशातून पैसे मिळवण्याची संधी मिळेल आणि मित्रांकडूनही सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणं तुमच्यासाठी चांगलं राहील, ज्याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून काही उत्साहवर्धक बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा येत राहील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायक असेल, व्यावसायिकांना चांगला नफा कमावण्यात यश मिळेल. संध्याकाळी तुम्ही कुटुंबासोबत काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल आणि घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्याल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ योगामुळे अनुकूल असणार आहे. मीन राशीचे लोक पैसे कमावण्यासोबत बचत करू शकतील आणि करिअरच्या चांगल्या संधीही तुम्हाला मिळतील. तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल, त्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अचानक मोठी रक्कम मिळाल्याने तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील सदस्यांसह तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखू शकता. जर तुम्हाला भागीदारीत काम करायचं असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमचा तुमच्या प्रियकरासोबत चांगला ताळमेळ राहील आणि नातं हळूहळू घट्ट होत जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Numerology: 'या' जन्मतारखेच्या लोकांचा आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा राहील