(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Numerology: 'या' जन्मतारखेच्या लोकांचा आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा राहील
Numerology Today 14 November 2023 : अंकशास्त्रात संख्यांच्या मदतीने व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते. मुलांकाद्वारे, म्हणजेच जन्मतारखेवरुन हे भविष्य समजतं, या द्वारे तुमचं आजचं भविष्य जाणून घ्या.
Numerology Today 14 November 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1: आजचा दिवस आनंदाचा
ज्यांचा जन्म 1,10, 19, 28 तारखेचा असतो, त्यांचा मूलांक 1 असतो. आज मूलांक 1 असलेल्या लोकांचं सामाजिक वर्तुळ वाढेल आणि त्यांना मनःशांतीसह आनंद मिळेल. व्यावसायिक कामामुळे प्रवासाची शक्यता आहे, यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. महत्त्वाची कागदपत्र सुरक्षित ठेवा, अन्यथा ती हरवू शकतात. आज गोवर्धन पूजेत कुटुंबासह सहभागी व्हाल आणि सुख-शांती नांदेल.
मूलांक 2 : मित्रांसोबत घालवता येईल वेळ
कोणत्याही महिन्याच्या 2,11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. आज गुरु किंवा गुरुसमान व्यक्तीला तुम्हाला भेटेल, यामुळे तुम्हाला खूप दिलासा मिळेल आणि याचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव होईल. काही लोकांच्या सल्ल्याने जीवनातील खडतर मार्ग सोपे होतील. नोकरदार लोक आज आपली कामं वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून ते आपल्या कुटुंबासह गोवर्धन पूजेला आणि जोडीदारासोबत उपस्थित राहू शकतील. आरोग्य चांगलं राहील आणि मित्रांसोबत मजा करण्याची संधी मिळेल.
मूलांक 3 : लोकांशी संबंध राहतील चांगले
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 असलेल्या लोकांना आज त्यांच्या करिअरमध्ये नाव कमावण्याची संधी मिळेल आणि तुमचं अधिकारक्षेत्र वाढू शकतं. आज तुम्ही लोकांशी केलेलं संभाषण तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, यामुळे तुम्हाला तुमचं काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची संधी मिळेल. शेजाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुमचे सामाजिक वर्तुळही विस्तारेल.
मूलांक 4 : उधारीवर वस्तू देणं टाळा
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा मासिक बजेट बिघडू शकतं. तुमच्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त तुम्ही काही गोष्टींमध्ये अडकून पडू शकता, ज्यामुळे तुमच्या कामात अडथळा येईल. व्यापार्यांनी आज कोणालाही वस्तू उधार देणं टाळावं, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्वतःला शांत ठेवा.
मूलांक 5 : सर्व कामं सहजपणे यशस्वी होतील
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. या लोकांचं नशीब आज त्यांच्यासाठी अनुकूल ठरेल आणि त्यांची सर्व कामं सहजपणे यशस्वी होतील. आज तुम्हाला एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला भेटून काही नवीन गोष्टींचीही माहिती मिळेल. प्रेम जीवनातील लोकांचा दिवस चांगला जाईल, ते आपल्या पार्टनरसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आखतील. वडिलांचा सल्ला व्यवसायात उपयुक्त ठरेल. मित्राकडून अडकलेले पैसे मिळाल्याने तुमचं मन प्रसन्न होईल.
मूलांक 6 : बाहेरचं खाणं टाळा
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. 6 मुलांकाच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. काही जुन्या समस्या तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतात. आज अनावश्यक समस्यांमध्ये अडकू नये, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आरोग्याची काळजी घ्या आणि बाहेरचं खाणं टाळा. नोकरदार लोकांना आज सहकाऱ्यांमुळे कामात अडचणी येऊ शकतात.
मूलांक 7 : निष्काळजीपणा टाळा
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 असलेल्या लोकांवर आज हवामानातील बदलाचा परिणाम दिसेल, त्यामुळे आरोग्याबाबत निष्काळजी राहणं टाळा. मुलांमुळे तुम्ही काहीशा मानसिक तणावाखाली राहू शकता आणि त्यांच्या काही कामांमुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. आईसोबत काही मुद्द्यांवर वैचारिक मतभेद होऊ शकतात, त्यामुळे काही काळ घरातील वातावरण बिघडू शकतं.
मूलांक 8 : कौटुंबिक जीवन चांगलं राहील
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असलेल्या लोकांची लोकप्रियता आज वाढू शकते. राजकारणाशी संबंधित तुमच्या कामातही प्रगती होऊ शकते. जुनी कामं पूर्ण करण्यात अडचणी आलेल्यांनाही आता लाभ मिळणार आहे. कौटुंबिक जीवन चांगलं राहील आणि तुम्ही कुटुंबासह गोवर्धन पूजेचा आनंद घ्याल. तुम्ही संध्याकाळी मुलांसाठी काही खरेदी देखील करू शकता.
मूलांक 9 : संघर्ष टाळा
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. 9 मुलांकाच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज सुरू असलेल्या एखाद्या कामात अचानक काही अडथळे येऊ शकतात, त्यामुळे ज्येष्ठांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करा. विद्यार्थ्यांना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळतील आणि कोणत्याही सरकारी योजनेचा चांगला लाभ मिळेल. आज तुम्ही कोणत्याही प्रकारचे वाद टाळावे, अन्यथा तुम्ही कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Diwali 2023: काय आहे गोवर्धन पूजा आणि अन्नकूटचं महत्त्व? जाणून घ्या कशी झाली सुरुवात