एक्स्प्लोर

Diwali Padwa 2022 : दिवाळी पाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक,  जाणून घ्या शुभ मुहूर्त 

Diwali Padwa 2022 : दर वर्षी लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो. मात्र यंदाच्या वर्षी भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी आले आहेत. 26 ऑक्टोबर म्हणजे उद्या दिवाळी पाडवा आहे.

Diwali Padwa 2022 : संपूर्ण भारतभर सध्या दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून या सणाकडे पाहिजे जाते.  दिवाळीचा सण नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून सुरु होतो. परंतु, यातील दिवाळी पाडव्याला खास महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून हा सण दिवाळी पाडव्याची ओळख आहे. या शूभ दिवळी मोठी खरेदी करण्याची पद्धत आहे. याबरोबरच या दिवशी व्यापारी मंडळी आपल्या जमाखर्चाच्या वह्या म्हणजेच चोपड्या, शाईची दौत आणि लेखनसाहित्याची पूजा करतात. काही व्यापारी या दिवसापासून व्यापारी वर्ष चालू करतात. यालाच विक्रमसंवत्सर म्हटले जाते. 

दर वर्षी लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेच्या आधी पाडवा येतो. मात्र यंदाच्या वर्षी भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी आले आहेत. 26 ऑक्टोबर म्हणजे उद्या दिवाळी पाडवा आहे. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्याची श्रद्धा आहे. 
 
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास यादिवशी सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नी पतीला ओवाळाचे. त्यामुळे दोघांचे आयुष्य वाढते अशी श्रद्धा आहे.  

 बलिप्रतिप्रदेची पूजा 

दिवाळी पाडव्याच्याच दिवशी बलिप्रतिपदा (Balipratipada 2022) पूजेला देखील विशेष महत्त्व आहे. बलिप्रतिपदेतला बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला तीन पावले जमिन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले. हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे. 

या  दिवशी काय करावे? 
कार्तिक शुक्ल प्रतिपदा या दिवशी जेवणात नेहमीच्या पदार्थांशिवाय इतर पदार्थ करुन त्यांचा श्रीकृष्णास नैवेद्य दाखवावा.  यादिवशी मिठाईच्या पदार्थांची देवापुढे रास उभारतात. शिवाय नातेवाईकांना या दिवशी घरी जेवायला बोलवण्याची पद्धत रूढ आहे.  

पाडव्याच्या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान करून नवीन वस्त्र परिधान करावे. याबरोबरच एखाद्या मोठ्या कामाला देखील सुरूवात करावी. गादीवर तांदळाने बळीची आकृती काढून तिची पूजा करावी. यामुळे शेतकरी राजाला वर्ष सुखाचे जाते असे मानले जाते.  

शुभ मुहूर्त
वही पूजनासाठी 26 सकाळी 6:45 ते स.9:30 आणि सकाळी 11 ते दु.12:15 व दु.4:30 ते सायं.6 या ही वहीपूजनासाठी शूभ वेळ आहे. याबरोबरच सायंकाळी 7 : 40 ते रात्री  9:10 या वेळेत देकील वहीपूजन करू शकता.   

महत्वाच्या बातम्या

Diwali Padwa 2022 : नवरा-बायकोच्या अतूट प्रेमाचं नातं जपणारा दिवस म्हणजेच 'दिवाळी पाडवा'; 'ही' आहे खास परंपरा 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today : उद्या घटस्थापनेचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? देवी दुर्गेची कृपा कोणत्या राशींवर? आजचे राशीभविषिय
उद्या घटस्थापनेचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? देवी दुर्गेची कृपा कोणत्या राशींवर? आजचे राशीभविषिय
Shardiya Navratri 2026 Wishes : शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
शारदीय नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा नवदुर्गांचा जागर, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
Trigrahi Yog 2026 : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्रिग्रही योगांचा जुळून येणार संयोग; 11 ऑक्टोबरपासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्रिग्रही योगांचा जुळून येणार संयोग; 11 ऑक्टोबरपासून 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु
Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिने बदललं नक्षत्र परिवर्तन...पुढचे 5 महिने 5 राशी जगतील ऐशोआरामात, शनिची सर्वात जास्त कृपा 'या' राशीवर
शनिने बदललं नक्षत्र परिवर्तन...पुढचे 5 महिने 5 राशी जगतील ऐशोआरामात, शनिची सर्वात जास्त कृपा 'या' राशीवर

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget