Dhanatrayodashi 2023 : धनत्रयोदशीला खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता? या दिवशी झाडू का खरेदी केला जातो? महत्त्व, मुहूर्त जाणून घ्या
Dhanatrayodashi 2023 : धनत्रयोदशीचा सण 10 नोव्हेंबरला आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला असे मानले जाते. या दिवशी झाडू खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी झाडू का खरेदी करावेत? जाणून घ्या
Dhanatrayodashi 2023 : कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. या दिवसापासून दिवाळीचे पंचपर्व सुरू होते. धनत्रयोदशी हा पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा पहिला दिवस आहे. त्रयोदशी तिथी 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 01:57 पर्यंत चालेल. धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. धनत्रयोदशीचा सण प्रदोष काळात साजरा करण्याची परंपरा असल्याने तो शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी खरेदीसाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी झाडू का खरेदी करावेत? जाणून घ्या
धनत्रयोदशीला लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी प्रदोष काळात गणेश, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे. या पूजेचा शुभ मुहूर्त 5.47 पासून सुरू होईल आणि 7.47 पर्यंत चालेल. यानुसार धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी एक तास 56 मिनिटे असेल.
धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ काळ
प्रदोष काल 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:46 ते 8:25 पर्यंत आहे. वृषभ राशीचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:08 ते 8:05 पर्यंत आहे. दिवे दान करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:46 ते 8:26 आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीसाठी शुभ मुहूर्त
पौराणिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी समुद्रमंथनातून अमृत पात्रासह प्रकट झाले. तेव्हापासून दरवर्षी धनत्रयोदशीला भांडी खरेदी करण्याची परंपरा पाळली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, भांडी, जमीन आणि संपत्तीची खरेदी जो शुभ करतो त्याच्या संपत्तीत तेरा पटींनी वाढ होते, असे म्हटले जाते. या वेळी धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी दुपारपासून संध्याकाळपर्यंतचा शुभ मुहूर्त असेल. विशेषतः दुपारी 12:56 ते 2:06 आणि नंतर 4:16 ते 5:26 ही वेळ खरेदीसाठी उत्तम राहील.
धनत्रयोदशीला झाडू का खरेदी केली जातो ?
धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. असे मानले जाते की या दिवशी झाडू खरेदी केल्याने लक्ष्मीची कृपा होते. या दिवशी नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा करावी. झाडू खरेदी करताना, त्याच्या संख्येकडे विशेष लक्ष द्या. या दिवशी झाडू नेहमी विषम अंकांमध्ये म्हणजेच 1, 3, 5 आणि 7 मध्ये खरेदी करावा. या पद्धतीने झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते.
देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते
दिवाळीच्या रात्री लक्ष्मीची पूजा केल्यानंतर या झाडूची पूजा कुंकू आणि तांदळानेही करावी. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते. असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडूने घर झाडणे देखील कर्जापासून मुक्त होण्यास मदत करते.
घराबाहेर यम दीप पेटवा
धनत्रयोदशीच्या दिवशी केवळ नवीन वस्तूंची खरेदीच होत नाही तर दिवेही लावले जातात. असे मानले जाते की घराच्या प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. कुटुंबाची ज्योत नेहमी धगधगत असते. त्याला यम दीप असेही म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Diwali 2023 : धनत्रयोदशीला 5 महासंयोग! दिवाळीत 14 शुभ योग बनणार, कोणत्या योगात काय खरेदी कराल? जाणून घ्या