एक्स्प्लोर

Chaturgrahi Yog : 5 वर्षांनंतर धनु राशीत बनतोय चतुर्ग्रही योग! 'या' राशींना होणार धनलाभ, आर्थिक स्थिती सुधरणार

Chaturgrahi Yog : धनु राशीमध्ये लवकरच सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्राचा संयोग होणार आहे. तब्बल 5 वर्षांनी हा योग जुळून आला असून यामुळे 3 राशीच्या लोकांना अपार लाभ होणार आहे.

Chaturgrahi Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत असतात. या ग्रह संक्रमणामुळे कधी शुभ योग, तर कधी राजयोगाची निर्मिती होते. दोनपेक्षा अधिक ग्रह एकाच राशीत एकत्र आले की विविध योग बनतात. आता लवकरच धनु राशीत सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्राचा संयोग होणार आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग, आदित्य मंगल राजयोग, बुधादित्य योग, धन योग यांसह अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत, ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडेल. हे योग विशेषत: 3 राशींसाठी भाग्यवान ठरणार आहेत, या राशींबद्दल जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

चतुर्ग्रही योग मेष राशीच्या भाग्य स्थानात निर्माण होणार आहे, त्यामुळे हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नोकरीच्या क्षेत्रातही तुम्हाला लाभ मिळणार आहे. व्यावसायिकांना या काळात चांगला आर्थिक लाभ होईल, तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता. कामाशी किंवा व्यवसायाशी संबंधित प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या पाचव्या भावात चतुर्ग्रही योग निर्माण होणार असल्याने तुमचं भाग्य उजळणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगल्या पगाराच्या नोकरीच्या ऑफर मिळतील, ज्यामुळे तुमच्या करिअरला चांगली गती मिळेल. तसंच या काळात तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांचं पूर्ण सहकार्य लाभेल. तसंच या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळणार आहेत. तुमच्या मुलांची चांगली प्रगती होईल. 

कन्या रास (Virgo)

चतुर्ग्रही योग तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. हा योग तुमच्या राशीतून चौथ्या घरात तयार असल्याने तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या सुखसोयी आणि साधनांमध्ये वाढ होईल. समाजात तुमचा सन्मान वाढेल. जर आपण नोकरदार लोकांबद्दल बोललो तर, त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीचे शुभ संकेत आहेत. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Vastu Tips : झाडूचा आदर केल्याने घरात नांदते लक्ष्मी; परंतु 'या' चुका केल्यास नोकरी-व्यवसायात होतं नुकसान

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget