एक्स्प्लोर

Vastu Tips : झाडूचा आदर केल्याने घरात नांदते लक्ष्मी; परंतु 'या' चुका केल्यास नोकरी-व्यवसायात होतं नुकसान

Benefits Of Broom : वास्तु शास्त्रात झाडूला विशेष महत्त्व आहे. झाडू ही घरातील लक्ष्मी आहे, जी गरिबी दूर करते. परंतु झाडूचा आदर करणं आणि त्याचा योग्य वापर करणं देखील तितकंच गरजेचं आहे.

Vastu Tips : अगदी साधा असा दिसणारा झाडू कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. झाडू घरातील कचरा आणि धूळ यासोबतच गरिबी देखील साफ करतो. झाडूला लक्ष्मीच्या रुपात पाहिलं जातं. लक्ष्मीच घरातील दारिद्र्य, दुःख, कलह आणि संकट दूर करू शकते. दुकान असो, घर असो किंवा ऑफिस, झाडूची योग्य देखभाल झाली तरच माणूल नशीबवान बनू शकतो.

झाडूमुळे गरिबी दूर होते आणि संपत्ती वाढते

कचरा साफ करण्यासाठी झाडूचा वापर केला जातो. झाडू हे घरातील संपत्तीचं प्रतीक आहे, म्हणून ते सांभाळून ठेवावे. त्यामुळे कुणाच्या घरातील झाडू दुसऱ्या कुणाला वापरण्यासाठी देखील दिला जात नाही. मान्यतेनुसार, एखाद्या घरातील झाडू नकळत दुसऱ्या घरात पोहोचला, तर घरावरील आशीर्वाद दूर होऊ लागतात.

झाडूचा आदर केल्यास व्यवसायात होत नाही नुकसान

व्यावसायिकांनी झाडूचा विशेष आदर केला पाहिजे. घरातील किंवा दुकानातील झाडूचा अनादर केल्याने किंवा झाडूला लाथ मारल्याने व्यापारी वर्गाचा पैसा क्षणात नाहीसा होतो. त्यामुळे घरामध्ये तसेच दुकानात झाडू योग्य ठिकाणी ठेवावा, झाडू बाहेरच्या व्यक्तीच्या नजरेस पडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

संध्याकाळनंतर झाडू मारणं समजलं जातं अशुभ

पुरातन मान्यतेनुसार, झाडू ही घरातील लक्ष्मी असते, जी घरातील गरिबी दूर करते. पूर्वीचे लोक म्हणायचे की, अंधार पडल्यावर घर झाडल्याने दारिद्र्य येते, झाडूवर पाऊल पडल्यास लक्ष्मीचा कोप होतो, तिला राग येतो आणि ती घर सोडते.

नवीन घरात जुना झाडू घेऊन जाणे आणि एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडल्यावर लगेच झाडून काढणे हे अशुभ मानले जाते. नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी नवीन झाडू घरात आणणे शुभ असते. घरावरील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि घराच्या भरभराटीसाठी झाडूशी संबंधित काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.

झाडूशी संबंधित या चुका टाळा

  • झाडू कोणत्याही जड वस्तूखाली ठेवू नये. घरातील कोणत्याही जड वस्तूखाली झाडू चुकून दाबला गेला तर त्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात.
  • घरात झाडू वापरात नसताना तो नजरेआड ठेवावा.
  • झाडू कधीही उभा ठेवू नये.
  • जाणून बुजून झाडूवर पाऊल टाकू नये हे लक्षात ठेवा.
  • झाडू नेहमी स्वच्छ ठेवा.
  • फार जुनी झाडू घरात ठेवू नका.
  • झाडू कधीही जाळू नये.
  • जुना झाडू बदलायचा असेल तर शनिवारी जुना झाडू बदलणे शुभ मानले जाते.
  • शनिवारी घरात विशेष स्वच्छता करावी.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : तब्बल 30 वर्षांनंतर कुंभ राशीत होणार बुध आणि शनीची युती; 'या' राशींना येणार अच्छे दिन, करिअर आणि व्यवसायात मिळणार यश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget