Chandra Gochar 2025 : चंद्राचा सिंह राशीत होतोय प्रवेश; 1 जूनपासून 'या' 3 राशींचाच वाजणार डंका, नशीब 360 डिग्री पलटणार
Chandra Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्र ग्रह प्रत्येक महिन्यांनी राशी परिवर्तन करतात. मात्र, जेव्हा चंद्राचा सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा काही राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणाप आहे.

Chandra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजपासून जून महिन्याला सुरुवात झाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हा महिना फार खास असणार आहे. वैदिक पंचांगानुसार, आज रात्री 9 वाजून 36 मिनिटांनी चंद्र ग्रह (Moon) आपली चाल बदलणार आहे. चंद्र ग्रह कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्र ग्रह प्रत्येक महिन्यांनी राशी परिवर्तन करतात. मात्र, जेव्हा चंद्राचा सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा सूर्याच्या ऊर्जेच्या प्रभावाने काही राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणाप आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी जून महिन्याची सुरुवात फार चांगली ठरणार आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायाशी संबंधित चांगली डील मिळू शकते. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, जर तुम्ही नोकरी बदलीचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी चांगला काळ असणार आहे. तुमच्यातील नातेसंबंध चांगले राहतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चंद्राचं हे संक्रमण सकारात्मक ठरणार आहे. तुमच्या कुटुंबातील वातावरण फार चांगलं असणार आहे. विवाहित लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असणार आहे. या काळात तुमचं गुंतवणूक करणं लाभदायी ठरेल. तसेच, तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करणं लाभदायी ठरेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी चंद्राचं सिंह राशीत प्रवेश करणं फार लाभदायी ठरणार आहे. वैवाहिक जीवनातील लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. कलात्मक दृष्टीने तुमचा वावर जास्त असेल. तसेच, व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. या काळात तुम्ही पाहिलेली स्वप्न तुम्हाला पूर्ण करता येतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















