Chanakya Niti : नवीन वर्षात देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार, चाणक्यांच्या 'या' खास गोष्टी कधीही विसरू नका
Chanakya Niti : नवीन वर्ष 2023 सुरू झाले आहे. चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रात सांगितलेल्या काही खास गोष्टींकडे लक्ष दिल्यास या वर्षी पैशाची कमतरता भासणार नाही आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील.
Chanakya Niti, Chanakya Motivational Quotes For Money : नवीन वर्ष 2023 (2023) आले आहे. नवीन वर्षात देवी लक्ष्मीचा (Goddess Lakshmi) हात डोक्यावर असावा. सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन यावा अशी लोकांची इच्छा असते. आचार्य चाणक्य सांगतात की, प्रत्येक व्यक्ती आपल्या मनात लक्ष्मीची इच्छा ठेवतो, परंतु प्रत्येकाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही. चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे, पैशाबाबत काही खास गोष्टींकडे लक्ष दिले तर, 2023 मध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. जाणून घ्या 2023 साठी चाणक्यनीती काय सांगते?
अतिप्रमाणात दिखावा करू नका
खोटं, कपट, दिखावा माणसाला अंधारात घेऊन जातो आणि एक दिवस श्रीमंत माणूसही गरीबीच्या मार्गावर येतो. या गोष्टींपासून दूर राहा. जेणेकरून धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. तुमची संपत्ती, पद आणि सौंदर्य याचा कधीच दिखावा करू नका. जे मनाने खरे आणि साधे असतात. अशा लोकांवर देवी लक्ष्मी कृपा करते.
कलहामुळे गरीबी येते
ज्या घरात ज्येष्ठांचा आदर, स्त्रियांचा आदर आणि इतरांच्या हिताची पूर्ण काळजी घेतली जाते, अशा व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात. बोलण्यातला गोडवा माणसाला आदर, कौटुंबिक आनंद आणि आनंदी जीवन देते. ज्याचा वाणी आणि मनावर ताबा असतो, त्याच्या जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो आणि सर्व बाजूंनी पैशाचा पाऊस पडतो. घरातील सदस्यांना त्रास देऊ नका. पती-पत्नीमधील वादामुळे घरात गरिबी येते.
दान धर्म
दान देणारा असतो, तो समाज, सृष्टी आणि ईश्वराप्रती आपले कर्तव्य पार पाडतो. यामुळे त्याची प्रगती तर वाढतेच, पण त्याला स्वर्गातही स्थान मिळते. सनातन धर्मात दानाचे महत्त्व सांगितले आहे. परोपकाराच्या कार्यामुळे व्यक्तीचे आर्थिक संकट दूर होते. 2023 मध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम ठेवायचा असेल तर दान करत राहा.
भविष्याबद्दल जागरूक राहा
ज्याला पैशाचे महत्त्व कळते, तो ना संकटात घाबरतो, ना त्याला कधी कुणासमोर हात पसरावे लागतात. ज्यांचा भविष्यातील योजनांबाबत कोणताही दृष्टीकोन नाही, त्यांच्यासोबत लक्ष्मी फार काळ राहत नाही. जे बचतीला महत्त्व देतात आणि अनावश्यक खर्च करत नाहीत. भविष्याबद्दल सतर्क आणि सावध राहतात त्यांनाच धनलक्ष्मी आपला आशीर्वाद देते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या