Capricorn Weekly Horoscope : पुढचे 7 दिवस मकर राशीसाठी खास! कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Capricorn Weekly Horoscope 27 January To 02 February 2025 : मकर राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मकर राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Capricorn Weekly Horoscope 27 January To 02 February 2025 : हिंदू कॅलेंडरनुसार, जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा मकर (Capricorn) राशीसाठी नेमका कसा असणार आहे? मकर राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मकर राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)
या आठवड्यात नात्यात तणावपूर्ण क्षणांमध्येही शांत राहा, कारण तुमच्यासाठी नातं जपणं आवश्यक आहे. काही स्त्रियांना त्यांचं नातं टॉक्सिक वाटू शकते आणि त्यातून बाहेर पडणं ही सर्वोत्तम कल्पना असेल. आठवड्याचे शेवटचे दिवस विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि कायमस्वरूपी निर्णयावर पोहोचण्यासाठी सर्वोत्तम असतील. बाकीची जोडपी सुट्टीची योजना बनवू शकता, शक्यतो एखाद्या हिल स्टेशनला जा. काही भाग्यवान महिलांचे विवाह या आठवड्यात प्रियकराशी निश्चित होऊ शकतात. विवाहितांनी या आठवड्यात नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप टाळावा.
मकर राशीचे करिअर (Capricorn Career Horoscope)
या आठवड्यात कामाच्या बाबतीत तडजोड करू नका. या आठवड्यात अडचणी येऊ शकतात. आरोग्य सेवा व्यावसायिक आणि वकील लोकांचं लक्ष वेधून घेणारी प्रकरणं हाताळू शकतात. ज्यांना नोकरी सोडायची आहे ते नोकरीच्या वेबसाीटवर त्यांचं प्रोफाइल अपडेट करू शकतात. मुलाखतींसाठी नवीन कॉल्स येतील. काहींना पदोन्नतीची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याची संधी मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आठवड्याचे शेवटचे दिवस देखील चांगले सिद्ध होऊ शकतात.
मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)
आठवड्याचे सुरुवातीचे दिवस भावंडांशी संपत्तीसंबंधी वाद सोडवण्यासाठी चांगले असतील. थकीत पैसे परत करण्याचा विचार कराल. तर महिला दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देतील. काही लोक व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. व्यावसायिकांना पैसे कमावण्याच्या संधी दिसतील. संपत्ती खरेदीसाठी आठवड्याचे शेवटचे दिवस चांगले आहेत.
मकर राशीचे आरोग्य (Capricorn Health Horoscope)
ज्यांना आरोग्याशी संबंधित आजार आहेत त्यांनी काळजी घ्यावी. या आठवड्यात किरकोळ समस्या उद्भवू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. स्त्रियांना स्त्रीरोगविषयक समस्या देखील असू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :