(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Capricorn weekly Horoscope 15 To 21 April 2024 : मकर राशीच्या जीवनात पुढील 7 दिवसांत घडणार महत्त्वाचे बदल; करिअर, आर्थिक जीवन फुलणार, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Capricorn Weekly Horoscope 15 To 21 April 2024 : नवीन आठवडा मकर राशीसाठी अनुकूल असेल. तुम्ही कामावर चांगलं काम कराल आणि वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील. एकूणच तुमच्यासाठी नवीन आठवडा कसा असेल? जाणून घ्या
Capricorn Weekly Horoscope 15th To 21st April 2024 : राशीभविष्यानुसार, नवीन आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा मकर राशीसाठी लाभदायी ठरेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि आरोग्यही चांगलं राहील. एकूणच मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Love Life Horoscope)
जर तुम्ही तुमच्या जोडीदारापासून दूर राहत असाल, म्हणजेच जर तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये असाल तर तुमचा जोडीदार तुम्हाला अचानक भेटायला येऊन सरप्राईझ देऊ शकतो. तु्म्हाला तुमचा प्रियकर खुश आहे ना, याची खात्री करावी लागेल. काहींचं नशीब इतकं चांगलं असेल की त्यांचा जुना प्रियकर त्यांच्या आयुष्यात पुन्हा येईल. विवाहितांनी बाहेर लफडी करू नये, अन्यथा वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
मकर राशीचे करिअर (Capricorn Career Horoscope)
ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या सांभाळून पार पाडा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या पडतील. या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. व्यावसायिक ऊर्जेनं आणि उत्साहानं काम करतील. व्यावसायिकांना नवीन ठिकाणी व्यवसाय वाढवण्याच्या भरपूर संधी मिळतील. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल.
मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)
तुमचं आयुष्य या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल. पैशाची आवक वाढेल. तुम्ही सोनं, वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करू शकता. तुमच्या जीवनात समृद्धी येईल, म्हणून तुम्ही दानधर्मात देखील पैसे खर्च करू शकता. तुमचा पगार वाढवण्यासाठी तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. या आठवड्यत भावंडांसोबत चाललेले मालमत्तेशी संबंधित वाद सुटतील. वडिलधारे लोक मुलांमध्ये मालमत्तेची विभागणी करू शकतात.
मकर राशीचे आरोग्य (Capricorn Health Horoscope)
कन्या राशीच्या काही लोकांना त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. ज्या महिलांनी नुकताच बाळाला जन्म दिला आहे, त्या फिटनेससाठी व्यायाम सुरू करू शकतात. जंक फूड टाळा. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. दारु पिणं सोडून द्या. दररोज योग आणि ध्यान करा, यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :