(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cancer Weekly Horoscope : कर्क राशीला नोकरी-व्यवसायात संघर्ष; सोबत धनलाभाच्या संधीही मिळणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Cancer Weekly Horoscope 10 June To 16 June : करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कर्क राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Cancer Weekly Horoscope 10 June To 16 June : हिंदू कॅलेंडरनुसार, जून महिन्यातला (June Month) तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा कर्क राशीसाठी नेमका कसा असणार आहे? कर्क राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कर्क राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कर्क राशीची लव्ह लाईफ (Cancer Love Horoscope)
कर्क राशीच्या व्यक्तींनी प्रेमसंबंधांतील समस्या हुशारीने सोडवा. या आठवड्यात काही लोकांच्या लव्ह लाईफमध्ये त्यांचा आधीचा प्रियकर पुन्हा येऊ शकतो. ज्या लोकांचा नुकताच ब्रेकअप झाला आहे, त्यांच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती प्रवेश करेल. या आठवड्यात जोडीदाराशी अनावश्यक वाद टाळा, यामुळे नात्यात गैरसमज वाढू शकतात. नात्यात एकमेकांचा आदर करा आणि जोडीदाराच्या भावनांबद्दल संवेदनशील राहा. विवाहितांनी विवाहबाह्य संबंधांपासून दूर राहावं.
कर्क राशीचे करिअर (Cancer Career Horoscope)
व्यावसायिक जीवनात चढ-उतार संभवतात. कार्यालयीन राजकारणामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामातील तुमची कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करा. काही लोक नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीसाठी मुलाखतीचा कॉल येऊ शकतो. कार्यालयीन वेळापत्रक खूप व्यस्त असेल. काही लोकांना चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीची ऑफर मिळेल. उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी परदेशात जाऊ शकतात. आयटी व्यावसायिकांना त्यांच्या कामाचे चांगले परिणाम मिळतील.
कर्क राशीचे आर्थिक जीवन (Cancer Wealth Horoscope)
या आठवड्यात पैसे कमावण्याच्या अनेक नवीन संधी मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होईल. शेअर बाजार, व्यापार किंवा नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याची इच्छा होईल. आर्थिक बाबतीत भाग्यवान ठराल. पण पैशाशी संबंधित निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोचू नका. आठवड्याच्या सुरुवातीला भावंडांशी असलेले पैशासंबंधीचे वाद मिटवण्याचा प्रयत्न करा.
कर्क राशीचे आरोग्य (Cancer Health Horoscope)
आरोग्याकडे लक्ष द्या. ज्येष्ठांना दीर्घकालीन आजारापासून आराम मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखा. तुमच्या आहारात प्रथिने आणि पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करा. या आठवड्यात महिलांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. पुरुषांनी वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: