Rajyog : पुढचे 22 दिवस 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ; नोकरीत प्रमोशनसह पगारवाढीचे संकेत, आरोग्यही राहणार तंदुरुस्त
Budhaditya Rajyog : मिथुन राशीमध्ये बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार झाला आहे, या राजयोगामुळे अनेक राशींना फायदा होणार आहे. नेमका कोणत्या राशीच्या लोकांना यातून विशेष लाभ मिळेल? जाणून घेऊया.
Budhaditya Rajyog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली चाल बदलतो, रास बदलतो. अशा वेळी, एकाच राशीत दोन ग्रह आल्यावर त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होतो. ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली रास बदलतो आणि त्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होतो. 14 जून रोजी सूर्याने (Sun) मिथुन राशीत प्रवेश केला आहे, त्याच वेळी बुध (Mercury) देखील मिथुन राशीत स्थित आहे. हे दोन्ही ग्रह एकाच राशीत असल्यामुळे बुधादित्य राजयोग तयार झाला आहे, ज्याचा प्रभाव 29 जूनपर्यंत सर्व राशींवर दिसून येईल. पण विशेषत: 3 राशींना या योगाचा फायदा होईल? या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
या राशीमध्ये झालेल्या सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. अशा स्थितीत मिथुन राशीच्या लोकांसाठी हा राजयोग भाग्याचा ठरेल. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो. या काळात जुन्या आजारांपासून आराम मिळेल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्याचबरोबर परदेशात नोकरीचं स्वप्न पाहत असाल तर ते पूर्ण होऊ शकतं. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील.
सिंह रास (Leo)
ज्योतिष शास्त्रानुसार, मिथुन राशीतील बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. यावेळी, तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल. यावेळी नशीब तुमची साथ देईल. नोकरदारांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैसे कमवण्यात यश मिळेल. रखडलेली कामं मार्गी लागतील. त्याच वेळी, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तरी तुम्हाला यश मिळेल. व्यवसाय भरपूर नफ्यात असेल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग फार लाभदायी ठरेल. या काळात तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. या काळात व्यवसायातही भरपूर फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. यावेळी तुमचं भाग्य उजळू शकतं. जमीन आणि मालमत्तेतून लाभ होईल. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :