(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : शनीच्या आधी बुधाचं संक्रमण; वृषभसह 'या' 3 राशीच्या लोकांनी ताकही फुंकून प्यावं, अन्यथा उभा ठाकेल संकटांचा डोंगर
Budh Gochar 2024 : शनीच्या आधी बुध 29 जूनला कर्क राशीत प्रवेश करेल. काही राशींसाठी बुधाचं हे संक्रमण शुभ ठरणार नाही, या राशींना पावलोपावली संकटांचा सामना करावा लागेल.
Budh Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात बुध हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो. बुध हा बुद्धिमत्ता, पैसा, व्यवसाय, संवाद, वाणी आणि करिअरचा कारक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 29 जून हा दिवस खूप खास असणार आहे. 29 जून 2024 रोजी रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी शनिदेव कुंभ राशीत वक्री होईल.
शनि वक्री (Shani Vakri 2024) होण्याआधी बुध 29 जून रोजी दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे या दिवशी काही राशींवर शनि आणि बुधाच्या चालींचा मोठा प्रभाव पडणार आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना सावध राहण्याची गरज आहे? जाणून घेऊया
वृषभ रास (Taurus)
बुधाच्या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमचं आरोग्य बिघडू शकतं. नोकरीतील काही सुवर्ण संधी तुमच्या हातातून निसटून जातील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबतही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना व्यवसायात नुकसान होऊ शकतं. व्यावसायिक भागीदारासोबत तुमचे वाद वाढू शकतात. तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांच्या करिअरसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. या काळात नोकरीत तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल, तुम्हाला सहजतेने काम करणं खूप कठीण जाईल. जे लोक स्वतःचा व्यवसाय चालवतात त्यांची विचार करण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते. यावेळी तुम्ही घेतलेले निर्णय प्रभावी ठरणार नाहीत, ज्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. व्यवसायातही नुकसान होऊ शकतं. कर्क राशीत होत असलेलं बुधाचं संक्रमण तुमचे खर्च वाढवणारं सिद्ध होईल. हे संक्रमण तुमच्या लव्ह लाईफसाठीही थोडं कठीण जाणार आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचे वाद होऊ शकतात.
सिंह रास (Leo)
बुधाच्या संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांच्या सुखसोयी कमी होऊ शकतात. हा काळ तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. नोकरीत तुम्हाला दबावाचा सामना करावा लागू शकतो. या राशीच्या लोकांचं करिअर डगमगू शकतं. सिंह राशीच्या लोकांवर यावेळी जबाबदारीचं ओझं वाढू शकतं. या काळात तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतील. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी चांगला नाही. या संक्रमणाचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :