Budh Gochar 2025 : 4 जानेवारीला होणार नवीन वर्षातलं पहिलं ग्रह संक्रमण; 3 राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम, बुध ग्रहामुळे जगतील राजासारखं आयुष्य
Budh Gochar 2025 : नवीन वर्षातील पहिलं संक्रमण ग्रहांचा राजकुमार बुध (Mercury) ग्रहाचं होणार आहे. 4 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनी बुध ग्रहाचं संक्रमण सुरु होईल.
Budh Gochar 2025 : नवीन वर्षाची (New Year) सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षातील पहिलं संक्रमण ग्रहांचा राजकुमार बुध (Mercury) ग्रहाचं होणार आहे. 4 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनी बुध ग्रहाचं संक्रमण गुरु बृहस्पतीच्या राशीत म्हणजेच धनु राशीत होणार आहे. बुध ग्रह धनु राशीत 24 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांपर्यंत असणार आहे. बुध ग्रहाचं राशी परिवर्तन 3 राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
धनु राशीत बुध ग्रहाचं संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. या काळात बुध ग्रहाच्या कृपेने तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होऊ शकतो. तसेच, तुमच्या हातात एखादी चांगली डील लागू शकते. या काळात तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने बुध ग्रहाचं संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी फार लाभदायी ठरेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
बुध ग्रहाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांसाठी या काळात अनेक संधी उपलब्ध होतील. तुमच्यासाठी हा काळ फार अनुकूल ठरणार आहे. तुमच्या बॅंक बॅलेन्समध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. 4 जानेवारी ते 24 जानेवारी या काळात जर तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ फार उत्तम ठरणार आहे. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, तुमचं सोशल नेटवर्किंग फार चांगलं असेल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
बुध ग्रहाच्या संक्रमणाने कुंभ राशीच्या लोकांची सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील. भगवान गणेशाची तुमच्यावर कृपा असणार आहे. त्यामुळे तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर प्रभुत्व ठेवण्याची गरज आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: