Shani Gochar : नवीन वर्षात सोनपावलांनी चालणार शनी; 'या' 3 राशींवर बरसणार शनीदेवाची कृपा, मागाल ती इच्छा होईल पूर्ण
Shani Gochar : शनीच्या संक्रमणामुळे काही राशींच्या लोकांना चांगलाच परिणाम मिळणार आहे. याचा काही राशींच्या लोकांना धनलाभ देखील मिळणार आहे.
Shani Gochar : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात कर्मफळदाता शनी (Shani Dev) कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती ग्रह आहे. शनीचं (Lord Shani) मीन राशीत संक्रमण 29 मार्च 2025 रोजी होणार आहे. शनीच्या संक्रमणामुळे काही राशींच्या लोकांना चांगलाच परिणाम मिळणार आहे. याचा काही राशींच्या लोकांना धनलाभ देखील मिळणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात तेव्हा त्यांना अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर, जेव्हा शनी एक राशीचक्र पूर्ण करतात तेव्हा त्यास 30 वर्षांचा कालावधी लागतो. शनीच्या या राशी संक्रमणाचा सर्व 12 राशींच्या लोकांवर चांगला-वाईट परिणाम पाहायला मिळतो.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनीचं संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला रोजगारात चांगली प्रगती पाहायला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक केलं जाईल. तसेच, ज्या लोकांना चांगली नोकरी आणि प्रमोशची गरज आहे त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. परदेशात जाण्याची संधी चालून येईल. तसेच, उत्पन्नाचे नवे सोर्स उपलब्ध होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीचं हे संक्रमण फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ पाहायला मिळेल. तसेच, मित्र-परिवाराबरोबर तुमचा काळ आनंदात जाईल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर उपलब्ध होतील. समाजात तुमची मान-प्रतिष्ठा वाढलेली दिसेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक असणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, जे कोल चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचा चांगला सहयोग मिळेल. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचा काळ आनंदात जाईल. तुम्हाला या काळात एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: