Ayodhya Ram Navami : प्रभू श्रीरामाच्या भाळी शोभे सूर्यटिळक; रामनवमीच्या मुहूर्तावर रामलल्लाला सूर्यकिरणांचा अभिषेक संपन्न
Ram Mandir Ram Navami : अयोध्येत रामनवमीचा सुरेख सोहळा पार पडला आहे. दुपारी 12 वाजता चार मिनिटं रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक झाला आहे, ही नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविकांची अयोध्येत गर्दी जमली होती.
Ayodhya Ram Navami Suryatilak : अयोध्येतील रामजन्मभूमीत प्रभी श्री रामाचे मंदिर निर्माण झाल्यानंतर आज पहिलीच रामनवमी (Ram Navami 2024) आहे, त्यामुळे रामभक्तांसाठी हा सोहळा उत्साहाचा आहे. प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र नवमीला दुपारी बारा वाजता झाल्याचं म्हटलं जातं आणि त्यामुळेच अयोध्येत देखील दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा रंगला. दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या भाळी सूर्यतिलकाची मोहोर (Ayodhya Ram Navami Surya Tilak) उमटली आहे. चार मिनिटं रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक झाला आहे, ही नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविकांची अयोध्येत गर्दी जमली होती.
राम मंदिरात सूर्यअभिषेकासाठी खास रचना
अयोध्येच्या मंदिरात अंबाबाईच्या मंदिराप्रमाणे सूर्यकिरणं दरवाज्यातून नाही, तर ती घुमटातून आली. रामजन्म, म्हणजे ठीक मध्यान्हाच्या वेळी दुपारी 12 वाजता सूर्यकिरणं रामललाच्या माथ्यावर पडली. घुमटाच्या गवाक्षातून येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवण्यासाठी ऑप्टोमेकॅनिकल सिस्टिमचा आधार घेतला गेला. या सिस्टिममध्ये अभिषेकासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे - दोन आरसे, एक पितळेचा पाईप आणि तीन लेन्सेसनी.
सगळ्यात मोठी लेन्स मंदिराच्या छतावर बसवली गेली होती. ती रिफ्लेक्ट होऊन ही किरणं पहिल्या आरशावर परावर्तीत केली गेली आणि मग पितळेच्या पाईपमधल्या पुढच्या दोन लेन्समधून प्रवास करत ही किरणं रामललाच्या कपाळावर पडली.
सूर्य टिळकाच्या वेळी 9 शुभ योग तयार, तीन ग्रहांची स्थिती त्रेतायुगासारखी
रामनवमीच्या दिवशी रामललाचा सूर्य टिळक दुपारी 12 वाजता संपन्न झाला. यावेळी केदार, गजकेसरी, पारिजात, अमला, शुभ, वाशी, सरल, कहल आणि रवियोग तयार होणार होते. या 9 शुभ योगांमध्ये रामललाचा सूर्य टिळक पार पडला. वाल्मिकी रामायणात असे लिहिले आहे की, रामाच्या जन्माच्या वेळी सूर्य आणि शुक्र त्यांच्या उच्च राशीत होते. चंद्र स्वतःच्या राशीत उपस्थित होता. या दिवशी जेव्हा गुरु आणि सूर्य मेष राशीमध्ये एकत्र असतात तेव्हा गुरु आदित्य योगाचा शुभ संयोग तयार होत आहे. असे संयोजन 12 वर्षांनंतर तयार होत आहे. नक्षत्रांचे हे संयोजन खूप शुभ चिन्ह आहे.
रवि योग : नवरात्रोत्सवात रवियोग तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार रवियोगात सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते. रवि योग हा एक शुभ योग मानला जातो, ज्यामध्ये सूर्याचा प्रभाव असतो. या काळात केलेल्या पूजेमुळे करिअरमध्ये सन्मान आणि यश मिळते.
कर्क राशी : यावेळी राम नवमीला चंद्र कर्क राशीत होता. भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान राम यांचा जन्म कर्क राशीत झाला होता.
हेही वाचा: