एक्स्प्लोर

Ram Navami 2024 : रामनवमीला अवघ्या 2 तास 33 मिनिटांचा शुभ मुहूर्त; संपूर्ण पूजा-विधी आणि उपाय जाणून घ्या

Ram Navami 2024 : धार्मिक पौराणिक कथेनुसार, चैत्र शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी, माता कौशल्येच्या पोटी भगवान रामाने जन्म घेतला. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी भजन-किर्तनांचा सोहळा रंगतो.

Ram Navami 2024 : चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच नवव्या दिवशी, नवमीला रामनवमी (Ram Navami 2024) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा रामनवमी 17 एप्रिल 2024 रोजी, बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. चैत्र मासाच्या नवमीला भगवान विष्णूंनी मानवरूपात रामाचा अवतार घेतला होता, असं सांगितलं जातं. वाल्मिकी रामायणानुसार, भगवान रामाचा जन्म कर्क राशीत दुपारी 12 वाजता झाला होता. अशा स्थितीत श्री राम जन्मोत्सव अभिजित मुहूर्तावर साजरा करणं शुभ असतं.

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा दिवस हा पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो. यावेळी रामनवमीला अत्यंत दुर्मिळ आणि विशेष योगायोग घडत आहेत. यावर्षी रामनवमीचा सण खूप शुभ असणार आहे, कारण या दिवशी गजकेसरी योग तयार होत आहे, जो श्रीरामाच्या कुंडलीतही होता. यावेळी रामनवमीच्या दिवशी अनेक शुभ योग बनत असल्याने हा दिवस अत्यंत फलदायी मानला जातो. आता रामनवमीला पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.

रामनवमीला पूजेचा शुभ मुहूर्त (Ram Navami 2024 शुभ मुहूर्त)

रामनवमी तारीख - 17 एप्रिल 2024, बुधवार

नवमी मध्याह्न पूजा मुहूर्त - सकाळी 11:10 ते दुपारी 01:43

कालावधी - 02 तास 33 मिनिटं

नवमी तिथी सुरुवात - 16 एप्रिल 2024 दुपारी 01:23 वाजता
नवमी तिथी समाप्ती - 17 एप्रिल 2024 दुपारी 03:14 वाजता

रामनवमी पूजा पद्धत (Ram Navami 2024 Pooja)

  • या शुभ दिवशी सकाळी लवकर उठा, अंघोळ करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. घरातील मंदिरात दिवा लावा.
  • देवी-देवतांना अंघोळ घालून त्यांना स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  • भगवान रामाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर तुळशीची पानं आणि फुलं अर्पण करा.
  • तसेच देवाला फळं अर्पण करा.
  • जर तुम्ही उपवास करू शकत असाल तर या दिवशी उपवासही ठेवा.
  • आपल्या इच्छेनुसार पुण्यपूर्ण वस्तू देवाला अर्पण करा.
  • या शुभ दिवशी प्रभू रामाची आरती करावी.
  • तुम्ही रामचरितमानस, रामायण, श्री राम स्तुती आणि रामरक्षास्तोत्र देखील पाठ करू शकता.
  • भगवंताच्या नामजपाचे रामनवमीच्या दिवशी खूप महत्त्व आहे. तुम्ही श्री राम जय राम जय जय राम किंवा सिया राम जय राम जय जय राम देखील म्हणू शकता.
  • रामनामाचा जप करण्याचा काही विशेष नियम नाही, तुम्ही कुठेही आणि कधीही रामनामाचा जप करू शकता.

रामनवमी 2024 उपाय (Ram Navami 2024 Remedies)

ओम

जो व्यक्ती रोज राम नामाचा जप करतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. रामनवमीच्या दिवशी तुमच्या इच्छेनुसार राम नामाचा जप करावा, तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.

ॐ रां रामाय नम:

या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटं दूर होतात. भगवान रामाचा मंत्र हा खूप प्रभावशाली आहे. रामनवमीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्याने शुभ फल प्राप्त होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani Vakri 2024 : शनीची चाल बदलणार; पुढील 1 वर्षात 'या' 4 राशी होणार मालामाल, शनीच्या कृपेने सुख-समृद्धी वाढणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget