Astrology Yog 2025 : मंगळ-चंद्रामुळे जुळून येणार 'धन योग'; 1 जानेवारीपासून 'या' 3 राशींचं पालटणार नशीब, हातात येणार पैसा
Astrology Yog 2025 : चंद्राच्या मकर राशीत असल्याने ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह या राशीच्या सातव्या चरणात विराजमान आहे. त्यामुळे धन योग नावाचा राजयोग निर्माण होणार आहे.
Astrology Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षात अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. याचा शुभ-अशुभ परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होतो. चंद्र हा सर्वात जलद गतीने चालणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत फक्त अडीच दिवसांपर्यंत स्थित असतो. अशातच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्राचा मकर राशीत (Capricorn Horoscope) प्रवेश होणार आहे. चंद्राच्या मकर राशीत असल्याने ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह या राशीच्या सातव्या चरणात विराजमान आहे. त्यामुळे धन योग नावाचा राजयोग (Rajyog) निर्माण होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ ठरु शकतो. याचा कोणत्या राशींना (Zodiac Signs) लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा धन योग फार लाभदायक ठरु शकतो. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही नियोजित केलेली कामे पूर्ण होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
नवीन वर्ष 2025 वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फार खास ठरणार आहे. या काळात तुम्हा ऑफिसमध्ये चांगलं यश मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तुम्ही केलेल्या संघर्षाचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांसाठी नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध होतील. तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार होईल. त्याचबरोबर वेतनवाढ होऊ शकते. या काळात तुम्हाला अचानक धनलाभही होऊ शकतो.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खास असणार आहे. तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास. तुम्ही तुमच्या बॉसला तुमच्या कामाने प्रभावित करु शकता. तुम्हाला चांगला बोनसदेखील मिळेल. तसेच, तुम्हाला हवी तिथे तुम्हाला ट्रान्सफर मिळेल. व्यापारी वर्गातील लोकांना चांगला धनलाभ मिळेल. तसेच, कुटुंबियांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल. वैवाहिक जीवन आनंदी असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: