Astrology : आज शिवयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह या 5 राशी ठरतील महाभाग्यशाली, बाबा भोलेनाथ होतील प्रसन्न
Astrology Panchang Yog 26 February 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 26 February 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस हा महाशिवरात्रीच (Mahashivratri 2025) दिवस आहे. आजच्या दिवशी अनेक महासंयोग (Yog) जुळून येणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस खास असणार आहे. तसेच, आज भगवान शंकराच्या प्रिय नक्षत्र श्रवण होऊन सुनफासह अनेक शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. भोलेनाथाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. कौटुंबित सुख-शांती मिळेल. तसेच, तुमच्या आजूबाजूला आज धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. आज आर्थिक सुख-सुविधांनी तुम्ही परिपूर्ण असाल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमची महत्त्वाची कामे अगदी वेळेत पूर्ण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपनवण्यात येतील त्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. भगवान शंकराची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर आज तुमची भेट होऊ शकते. आज तुमच्या जीवनात प्रेमभाव टिकून राहील. जोडीदाराप्रती तुम्हाला अधिक जिव्हाळा वाटेल. तसेच, व्यवसायातून कमावलेल्या पैशांतून तुम्हाला समाधान मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
आज वृश्चिक राशीच्या लोकांवर भोलेनाथाची कृपा असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंददायी जाणार आहे. आज तुमच्या हातून पुण्याचं काम घडेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. कामाच्या ठिकाणी आज तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आज शुभ कार्यात सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा आनंद घेऊ शकता. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून थांबलेले काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येणार आहे. आज तुम्हाला दिवसभरात एखादी सकारात्मक बातमी ऐकायला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















