Astrology : आज समयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्यासह 'या' 5 राशींच्या संपत्तीत होणार भरभराट, देवी लक्ष्मीची राहील कृपा
Astrology Panchang Yog 25 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ कोणत्या राशींना मिळणार आहे ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 25 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 25 सप्टेंबरचा दिवस आहे. तसेच, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. आज चंद्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. तसेच, शारदीय नवरात्रीचा (Shardiya Navratri 2025) आजचा चौथा दिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. आज समयोगासह (Yog) रवियोगसुद्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे आजच्या शुभ राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ कोणत्या राशींना मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, आज कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नवीन गोष्टी शिकाल. आर्थिक बाबतीत तुमची स्थिती फार शुभ असणार आहे. कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. भौतिक सुख सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं. तसेच, वैवाहिक जीवनाचा तुम्हाला चागंला लाभ घेता येईल. नशिबाची साथ तुमच्या पाठीशी असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. तुमच्या करिअरचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, सरकारी क्षेत्राचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तसेच, मित्रांचा तुम्हाला चांगला सपोर्ट पाहायला मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. नोकरीच्या बाबतीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याची संधी तुम्हाला लवकरच मिळू शकते. कामाच्या बाबतीत तुमचं बॉसकडून कौतुक केलं जाईल. तसेच, लवकरच शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. भौतिक सुख सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, आर्थिक सुख-सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढलेला दिसेल. नवीन कार्याची सुरुवात तुम्ही लवकरच करु शकता.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















