Astrology : आज सिद्धी योगासह प्रदोष व्रताचाही शुभ संयोग; वृषभ आणि सिंहसह 'या' राशीही होतील मालामाल, बॅंक बॅलेन्स दुपटीने वाढणार
Astrology Panchang Yog 19 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 19 September 2025 : वैदिक शास्त्रानुसार, आज 19 सप्टेंबर 2025 शुक्रवारचा दिवस आहे. त्यानुसार आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी प्रदोष व्रताचा (Pradosh Vrat) देखील शुभ संयोग (Yog) जुळून आला आहे. तर, चंद्राने सिंह राशीत संक्रमण केलं आहे. आज कला योगासह सिद्धी योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आजच्या शुभ राशींना नशिबाची चांगली साथ मिळणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस सुख समृद्धीचा असणार आहे. आज तुमच्या कलात्मक क्षमतेला चांगला वाव मिळेल. तसेच, भौतिक सुखाचा लाभ घेता येईल. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं. अनेक दिवसांपासून राहिलेली तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला पूर्ण करता येईल. तसेच, वाहन खरेदीचा शुभ योग लवकरच जुळून येणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, बिझनेसमध्ये देखील तुमची चांगली प्रगती दिसून येईल. आयात-निर्यातीच्या क्षेत्रात असलेल्या लोकांना आज लाभ मिळेल. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनातील वादविवाद दूर होतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज दिवसाच्या सुरुवातीलाच तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. भौतिक सुख सुविधांचा तुम्हाला लाभ मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसैच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, मित्रांचा चांगला सपोर्ट मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला नवीन शिकण्याची संधी मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















