Astrology : आज शश राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग, मिथुनसह 'या' 5 राशींवर असणार शनिदेवाचा कृपा; मिळणार उत्तम संधी
Astrology Panchang Yog 18 January 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशींना कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल.
Astrology Panchang Yog 18 January 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज शनिवारचा दिवस आहे. आजचा दिवस शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आज पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. तसेच, आजच्या दिवशी शश राजयोग, गजकेसरी योग (Yog) आणि शोभन योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशींना कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. तसेच, अनपेक्षित लाभ मिळेल. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. आज तुम्हाला नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, कुटुंबियांची साथ तुमच्याबरोबर असेल. तुमच्या आजूबाजूला आनंदी वातावरण पाहायला मिळेल. आज जर तुम्हाला व्यवसायात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला चांगलं स्थान मिळेल. तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आह. त्यामुळे तुमचा आनंद गगनात मावेनासा होईल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. मात्र, आज तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल त्यामुळे तुम्ही फार आनंदी असाल. तसेच, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज भेटवस्तू देखील दिली जाऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करु नका.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणरा आहे. तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतूल तुम्हाला भविष्यासाठी चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. कामात तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळत राहतील. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ फार आनंददायी जाणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमची दूरच्या नातेवाईकांशी भेटीगाठी होऊ शकतात. तसेच, तुमच्या कुटुंबात लवकरच शुभकार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. नोकरदार वर्गातील लोकांना सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: