Astrology: आज अंगारकी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग! 'या' 5 राशींसाठी धनलाभाचे संकेत, श्रीगणेशाचे आशीर्वाद
Astrology Panchang Yog 12 August 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 12 August 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज 12 ऑगस्ट 2025 चा दिवस आहे. आजचा दिवस अंगारकी चतुर्थीचा दिवस असून भगवान श्रीगणेशाला समर्पित आहे. तसेच, आज चंद्र, मीन राशीत प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळासोबत संसप्तक योग तयार होईल. या शिवाय आज सर्वार्थ सिद्धी योगाचे संयोजनही होईल. आजचा दिवस भगवान गणेशाचे आशीर्वाद आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असेल. आज तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. व्यवसायात अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील आजचा दिवस नफा मिळविण्याच्या दृष्टीने खूप अनुकूल राहणार आहे. जवळच्या मित्रांचा पाठिंबा मिळेल. आज तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल. तुमच्या कुटुंबात आनंद आणि समृद्धी येईल. यासोबतच आज वैवाहिक जीवनातही उत्साह राहील. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते मजबूत होईल.
मिथुन
ज्योतिषशास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम हा मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामाबद्दल गंभीर असाल, ज्यामुळे तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. यासोबतच, आज सरकारी सेवेत काम करणाऱ्या लोकांसाठी अतिरिक्त फायदेशीर ठरू शकतो. आज तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. उच्च अधिकारी तुमच्या कल्पनांचा आदर करतील आणि तुमच्या योजनांना हिरवा कंदील देतील. आज कामात यश मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे पूर्ण श्रेय तुम्हाला मिळेल. यासोबतच तुमचा आदरही वाढेल. तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल. तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येईल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा मंगळवार अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम देईल. आज तुमच्या कामाला गती मिळेल. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांना आज अतिरिक्त फायदे मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. दुसरीकडे, जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते तुमच्या जोडीदाराच्या नावाने करू शकता. यासोबतच, आज तुमच्या कुटुंबातील वातावरण मजेदार राहणार आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नाबाबत काही अडथळा आला असेल तर तो दूर होऊ शकतो.
वृश्चिक
आजचा मंगळवार वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. वैवाहिक जीवन आनंददायी राहील आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अनपेक्षित परिणाम मिळतील. तुम्हाला जुन्या संपर्कांचा फायदा मिळेल. त्यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी चांगला करार होण्याची शक्यता मिळू शकते. आजचा दिवस कामाला एक नवीन ओळख देण्याचा असेल. आज तुमच्या कामाचे सार्वजनिकरित्या कौतुक केले जाईल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. आज तुम्हाला कुठूनतरी आशेचा किरण मिळू शकेल. कुटुंबात अनुकूल वातावरण असेल. यासोबतच, तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकेल.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा मंगळवार हा उत्तम राहणार आहे. व्यवसायात अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील. आज चांगला नफा मिळू शकतो. आज तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत असाल. तुम्हाला वाहनाचा आनंद मिळू शकतो, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. विशेषतः जवळचे नातेवाईक तुम्हाला अनपेक्षितपणे मदत करू शकतात. आज तुम्हाला तुमच्या आईकडून चांगले फायदे मिळू शकतात. तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते गोड होईल.
हेही वाचा :
Angaraki Chaturthi 2025: आजची अंगारकी चतुर्थी 'या' 5 राशींचे नशीब पालटणारी! अखेर बाप्पाची कृपादृष्टी झालीच, संकटमुक्त व्हाल, सोबत पैसाही येईल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















