Astrology : रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर जुळून आला धन योग; तूळसह 'या' 5 राशींवर होणार धन-संपत्तीचा वर्षाव, लवकरच होणार मालामाल
Astrology Panchang Yog 06 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 06 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 6 एप्रिलचा दिवस म्हणजेच रविवारचा दिवस आहे. तसेच, आज रामनवमीचा दिवस आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तसेच, आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. तसेच, रामनवमीच्या मुहूर्तावर अनेक उत्तम संयोग जुळून आले आहेत. तसेच, आज सूर्य आणि पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग जुळून येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त असाल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती दिसून येईल. भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ घेता येईल. कुटुंबात प्रसन्न वातावरण असेल. धनसंपत्तीचा चांगला लाभ घेता येईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी रामनवमीचा दिवस फार शुभ असणार आहे. तसेच, तुम्हाला विविध स्त्रोतांमधून धनलाभ मिळेल. लवकरच तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता. कुटुंबात तुमच्या आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्ही लवकर नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी देखील खरेदी करु शकता. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. रामनवमी असल्या कारणाने या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार वाढलेला दिसेल. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळणार आहे. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणा आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवू शकता. त्यामुळे आनंदी वातावरण निर्माण होईल. आज तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करु शकता. मित्र-परिवाराबरोबर देखील तुम्ही चांगला वेळ घालवू शकता.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने आज घरी पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं. तसेच, भावा-बहिणीमध्ये चांगले संबंध निर्माण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















