एक्स्प्लोर

Astrology : आज रवि योगासह बनले अनेक शुभ योग; कुंभ राशीसह 'या' राशींना होणार धनलाभ, राशीनुसार करा 'हे' उपाय

Panchang 31 March 2024 : आज, म्हणजेच 31 मार्च रोजी रवि योग, सर्वार्थ सिद्धी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस कन्या, कुंभ राशीसह इतर राशींसाठी फलदायी ठरणार आहे. तसेच, रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे, त्यामुळे आज या 5 राशींवर सूर्यदेवाची देखील कृपा राहील.

Astrology Today 31 March 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज, रविवार, 31 मार्चला चंद्र वृश्चिक राशीनंतर धनु राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी वरियान योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

मिथुन (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे. आज मिथुन राशीचे लोक त्यांच्या आवडत्या वस्तूंच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात खर्च करतील आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजा देखील पूर्ण करतील. आज व्यावसायिकांसाठी प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील आणि चांगला नफा मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आज रविवारच्या सुट्टीमुळे लव्ह लाईफमधील लोक एखाद्या चांगल्या ठिकाणी प्रियकराला भेटू शकतात आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवू शकतात. विवाहित लोक आज आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील आणि आज तुम्ही कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाण्याचा विचारही कराल.

रविवारचा उपाय : नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी तांब्याच्या भांड्यात तांदूळ, काही लाल मिरचीचे दाणे आणि लाल फुले आणि पाणी मिसळून सूर्यदेवाला अर्पण करा.

कन्या (Virgo Horoscope Today)

आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कन्या राशीचे लोक वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्यात यशस्वी होतील. तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केलं तरच तुम्हाला यश मिळेल आणि तुमची अपूर्ण कामं पूर्ण होतील. नोकरदार लोक आज रविवारच्या सुट्टीमुळे मौजमजा करतील. तुमच्याकडे मजेचं जीवन जगण्यासाठी पुरेसा पैसा असेल आणि तुम्ही आर्थिक योजना बनवण्याचा विचार देखील कराल. रविवारची सुट्टी असल्याने घरात मुलांचा आवाज असेल आणि नवीन पदार्थही चाखता येतील.

रविवारचा उपाय : आर्थिक प्रगतीसाठी सूर्यदेवाला पाण्यात काही तांदळाचे दाणे मिसळून अर्पण करा आणि सूर्य बीज मंत्राचा जप करा.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. मार्चच्या शेवटच्या दिवशी वृश्चिक राशीचे लोक कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील आणि सर्व सदस्यांसाठी काही खरेदीही करतील. तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही योजनांना गती मिळेल, ज्यामुळे तुम्ही चांगले पैसे कमवाल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत असाल तर आज ती चिंता संपेल. कोणत्याही कायदेशीर प्रकरणात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास ते तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. नोकरदार लोक आज रविवारच्या सुट्टीमुळे आराम करतील आणि मित्रांसोबत चित्रपट पाहू शकतात किंवा इतर काही योजना आखू शकतात.

रविवारचा उपाय : सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि आदित्य स्तोत्राचा पाठ करा. तसेच मीठ नसलेलं अन्न खाणं फायदेशीर ठरेल.

धनु (Sagittarius Horoscope Today)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असेल, आज त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल. धनु राशीचे लोक आज आपल्या कुटुंबाची काळजी घेतील आणि मित्रांसोबत फिरायलाही जाऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याचं लग्न निश्चित झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांसोबत बसून तुम्ही घराची डागडुजी करायचा विचार कराल, ज्यासाठी चांगले पैसेही खर्च होतील. ज्यांना शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होणार आहे. धार्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होईल.

रविवारचा उपाय : पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात गूळ आणि तूप मिसळा आणि सूर्यदेवाला अर्पण करा आणि सूर्य चालिसा पठण करा.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. कुंभ राशीचे लोक आज अतिरिक्त उर्जेने परिपूर्ण असतील, ज्यामुळे ते भविष्यातील योजनांवर लक्ष केंद्रित करू शकतील. तुमच्या मुलांच्या करिअरबाबत काही अडचण असेल तर आज तुम्हाला त्यातून सुटका मिळू शकेल. व्यावसायिक कामाच्या संदर्भात तुमचा प्रवास होऊ शकतो, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला कौटुंबिक सदस्याकडून काही चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. आज तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही अविवाहित असाल तर आज तुम्हाला कोणी खास व्यक्ती भेटू शकते. रविवार मजेत घालवाल आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल.

रविवारचा उपाय : तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडाच्या पानावर तुमची इच्छा लिहा आणि नंतर ती वाहत्या पाण्यात सोडा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope : रविवारचा दिवस मेष, कुंभ राशींसाठी वरदानाप्रमाणे; तर 'या' राशींना बसणार आर्थिक फटका, वाचा आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Vision Worli : वरळी माझ्या परिचयाचा भाग, बाळासाहेबांसोबत अनेदा आलोयRaj Thackeray Vision Worli : तुम्ही मुंबईचे मालक, रडता कशाला? राज ठाकरेंची कोळी बांधवांना सादTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 21 Sept 2024 : 6 PmAnandache Pan : आशाताईंच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडणारं पुस्तक 'स्वरस्वामिनी आशा' : 21 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Rishabh Pant : रिषभ पंतनं केली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटीमध्ये गाठला मोठा टप्पा
रिषभ पंतकडून महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये गाठला टप्पा
Atishi CM मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Video : मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Tirupati Laddu Controversy : पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
Embed widget