Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; कन्यासह 'या' 3 राशींना होणार दुप्पट लाभ, पैसा अडका होणार डबल
Panchang 31 July 2024 : आज बुधवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. कन्यासह 3 राशींवर आज हनुमंताची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology 31 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज बुधवार, 31 जुलै रोजी चंद्र वृषभ राशीनंतर मिथुन राशीत जाणार आहे. वृषभ राशीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून या तिथीला कामिका एकादशी व्रत पाळण्यात येणार आहे. कामिका एकादशी व्रताच्या दिवशी गजकेसरी योगासह सर्वार्थ सिद्धी योग, ध्रुव योग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. यानुसार आज कोणत्या 3 राशींना नशिबाची सर्वाधिक साथ मिळणार? जाणून घेऊया आजच्या भाग्यवान राशी...
मिथुन रास (Gemini)
आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. आज बाप्पाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनातील समस्यांपासून आराम मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. व्यवसायात मुलं तुम्हाला साथ देतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि तुम्ही नवीन रणनीतींवर काम करण्यास सुरुवात कराल. नोकरदार लोकांना त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे आज चांगली बातमी मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावही वाढेल. तुमचे एखादं काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप आराम आणि आनंद मिळेल. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं तर, कुटुंबाच्या कल्याणासाठी तुम्ही काही विशेष निर्णय घ्याल, ज्यामध्ये प्रत्येकजण तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला तुमच्या पालकांचे आशीर्वादही मिळतील. नवविवाहित लोकांच्या घरी लहान पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं, ज्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण निर्माण होईल.
कर्क रास (Cancer)
आज कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन प्रकाशाचा किरण येईल. आज तुम्हाला तुमच्या कामात समाधान वाटेल. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला आज चांगला नफा मिळेल आणि तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंधही अनुकूल राहतील. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी येण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात काही कारणाने तणाव असेल तर आज बाप्पाच्या कृपेने सर्व चिंता दूर होतील आणि घरात सकारात्मक वातावरण राहील. तसेच, सर्व सदस्य एकमेकांना मदत करण्यास तयार असतील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांची प्रलंबित कामं आज पूर्ण होऊन त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या राशीचे विद्यार्थी चिकाटीने अभ्यास करतील आणि त्यांना त्यांच्या वडिलांचे आणि शिक्षकांचे आशीर्वादही मिळतील. जर तुम्ही कोणत्याही कामाचं नियोजन करत असाल तर आज तुम्हाला त्यात यश मिळेल आणि अडथळे दूर करणाऱ्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व चिंता दूर होतील. नोकरदार लोकांना आज एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळेल, ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता खरेदी करण्याचा आणि तुमच्या मुलांसोबत चांगला वेळ घालवण्याचा विचार कराल. कुटुंबात काही समस्या चालू असतील तर त्या आज दूर होतील आणि भावा-बहिणींशी संबंध अधिक घट्ट होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :