Astrology : आज अमला योगासह बनले अनेक शुभ योग; कर्कसह 5 राशींना सोन्याचे दिवस, महादेवाच्या कृपेने उत्पन्न होणार डबल
Panchang 30 September 2024 : आज सोमवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी अमला योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 30 September 2024 : आज सोमवार, 30 सप्टेंबर रोजी, चंद्र सिंह राशीत राहणार आहे आणि गुरू चंद्रापासून दहाव्या भावात असल्यामुळे आज अमला योग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून या दिवशी सोम प्रदोष व्रत आणि त्रयोदशी तिथीचं श्राद्धही केलं जाईल. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी अमला योग, शुक्ल योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
आजचा म्हणजे सोम प्रदोष व्रताचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. आज महादेवाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हं आहेत. आज तुमच्या ऑनलाईन ऑर्डर तुम्हाला प्राप्त होतील. व्यावसायिकांनी आधी केलेल्या योजना यशस्वी होतील आणि त्यांना अधिक नफा मिळवता येईल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे, नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. आज नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांची मदत मिळेल आणि त्यांची कामं वेळेवर पूर्ण करता येतील. लव्ह लाईफमध्ये असलेल्यांसाठीही दिवस चांगला जाईल. आज तुम्ही जुन्या मित्रांना भेटाल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज भोलेनाथांच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांच्या दीर्घकाळ दडपलेल्या इच्छा अचानक पूर्ण होऊ शकतात, त्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. आज तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून पैसे कमवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमचा बँक बॅलन्स देखील वाढेल. आज तुमचे सोशल सर्कल वाढेल. नोकरी करणारे लोक आज दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात. आज त्रयोदशी तिथीला कुटुंबात श्राद्ध विधी करता येईल. संध्याकाळी तुम्ही मुलांसोबत बाजारात जाऊ शकता, जिथे तुम्ही त्यांच्यासाठी काही खरेदी देखील कराल.
कन्या रास (Virgo)
आजचा, म्हणजेच सोम प्रदोष व्रताचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. कन्या राशीचे लोक आज एखाद्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी संपतील. जर तुम्हाला एखादी गाडी किंवा मालमत्ता खरेदी करायची असेल तर आज तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्ग देखील सापडतील. आज तुम्ही व्यवसायात एखादी योजना सुरू करू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन चांगलं राहील आणि गरजेच्या वेळी तुम्ही लोकांसोबत उभे राहाल.
वृश्चिक रास (Scorpio)
आजचा, म्हणजे सोम प्रदोष व्रताचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. आज वृश्चिक राशीच्या लोकांना शत्रूंपासून मुक्ती मिळेल. तुमच्या मुलाच्या लग्नात काही अडथळे असतील तर आज ते तुमच्या भावाच्या मदतीने दूर होतील आणि श्राद्धविधीमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यही सहकार्य करतील. तुम्ही कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये अडकले असाल तर आज तुम्हाला दिलासा मिळेल असं दिसतं. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित काही वाद चालू असतील तर ते आज कुटुंबातील सदस्याच्या मदतीने सोडवले जाऊ शकतात. आज नोकरदार वर्ग आपली कार्यालयीन कामं आनंदाने पूर्ण करेल. आज अविवाहित लोकांच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचा प्रवेश होईल.
मकर रास (Capricorn)
आजचा सोम प्रदोष व्रताचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. महादेवाच्या कृपेने अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. सोम प्रदोषामुळे घरातील वातावरण धार्मिक राहील. तुमच्या भावा-बहिणींसोबत तुमचं वागणं विनोदी असेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी ऑनलाईन काहीतरी खरेदी करू शकता. व्यवसायात कठोर परिश्रम केल्यानंतर तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी दिसाल. त्याचबरोबर रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांनाही आज चांगली बातमी मिळू शकते. नशिबाच्या पाठिंब्याने आज तुमची सर्व कामं सुरळीत आणि वेळेवर पूर्ण होतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: